Pune : पुणे महापालिका हवा प्रदुषणाबाबत गंभीर, बांधकाम व्यावसायीक व मेट्रो प्रशासनाला बजावली नोटीस

प्रदुषणाच्या हॉट स्पॉटवर बसवणार कारंजे

एमपीसी न्यूज –  मागील आठ ते दहा  दिवसांपासून पुण्याच्या हवेची गुणवत्ता (Pune) पातळी ही दिवसेंदिवस खालावत असून शिवाजीनगर परिसरात ही पातळी अत्यंत धोकादायक पातळीवर पोहचली आहे. त्याचाच परिणाम म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेपाठोपाठ आता पुणे महापालिकेने ही बांधकाम व्यावसायीक व मेट्रो प्रशासनाला बांधकाम व खोदकामा संदर्भात नोटीस पाठवली आहे.  याबरोबरच पुणे शहरात जे प्रदुषणाचे हॉट स्पॉट आहेत तिथे महापालिका कारंजे बसवण्याचा विचार करत आहे.

Nigdi : निगडी पीएमपीएमएल पास केंद्राची तोडफोड, प्रशासनाने कडक कारवाई करण्याची  मागणी

मागील दोन आठवड्यांपासून पुण्यामध्ये हवेचं प्रदूषण वाढलेलं दिसून येत आहे. पुणे महानगरपालिकेकडून हवेचं प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यास सुरुवात झालेली आहे.पुणे महापालिकेकडून बांधकाम व्यवसायिकांना आणि मेट्रो प्रशासनाला नोटिसा बजावण्यास सुरुवात झालेली असून राज्य प्रदूषण नियामक महामंडळाच्या आदेशानुसार पुणे महापालिकेने कार्यवाहीला सुरुवात केलीय.

कामाच्या ठिकाणी धुळीपासून होणारं प्रदूषण रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत? याची माहिती घेण्यासाठी महापालिकेकडून कार्यवाही सुरु झालेली आहे. प्रदूषण रोखण्यासाठी शहरात गर्दीच्या चौकांमध्ये लवकरच मिस्ट बेस्ड् फाऊंटन उभारण्यात येणार असून हवेची गुणवत्ता वाढवण्यासाठी महापालिका अनेक उपाययोजना राबवणार असल्याची माहिती आहे.

हॉटस्पॉट वर  बसवणार कारंजे –

पुण्यातील वाढत्या प्रदूषणाच्या पातळीला प्रतिसाद म्हणून, पुणे महानगरपालिकेने हवेच्या गुणवत्तेवर होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, महापालिकेने शहरातील 20 मोक्याच्या ठिकाणी कारंजे बसवण्याची योजना आखली आहे, ज्यात मोठ्या रहदारीच्या चौकांवर लक्ष केंद्रित केले आहे. हे कारंजे धुळीचे कण कमी करण्यात आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील, असे पीएमसी प्रशासनाचे म्हणणे आहे.

बिघडलेल्या हवेच्या गुणवत्तेबद्दल केवळ स्थानिक अधिकाऱ्यांनीच नव्हे तर मुंबई उच्च न्यायालयानेही चिंता व्यक्त केली आहे, ज्याने अलीकडेच पुण्यासह महानगरपालिकांना वाढत्या प्रदूषणाच्या संकटाचा सामना करण्यासाठी त्वरित आणि प्रभावी पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.

तसेच नागरिकांनी सीएनजी व इलेक्ट्रीक गाड्या वापरण्यावर भर द्यावा यासाठी पण महापालिका उपाय योजना करणार आहे. त्यासाठी नागरिकांना प्रोत्साहीत करण्यासाठी महापालिका योजना आखणार आहे. तसेच या उपायोजना कीती प्रभावी पणे काम करत आहेत याचेही निरीक्षण महापालिका पुढील काही महिन्यात करणार (Pune) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.