Vadgaon Maval : बालविकास मित्र मंडळातर्फे गणेशयाग महोत्सवाचे आयोजन

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथील श्री चिंचेचा चिंतामणी गणपती  ( Vadgaon Maval ) मंदिर बालविकास मित्र मंडळ यांच्यावतीने गणेशयाग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम तसेच युवा कीर्तनकार ह भ प अक्षय महाराज पिंगळे यांचे कीर्तन होणार आहे. हा कार्यक्रम सोमवारी (दि. 20) राजमाचीकर काका मैदान, वडगाव मावळ येथे होणार असल्याची माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माधवराव ढमाले व कार्यक्रम प्रमुख अतुल राऊत यांनी दिली.
श्री चिंचेचा चिंतामणी गणपती मंदिर बालविकास मित्र मंडळ गणेशयाग महोत्सव तसेच चिंचेचा चिंतामणी गणपती मंदिर 29 वा वर्धापनदिन सोमवार दि. 20 नोव्हेंबर संपन्न होत आहे.
कार्यक्रम रूपरेषा
सकाळी 7 वाजता – श्री चा अभिषेक
सकाळी 8 वाजता – होमहवन व सत्यनारायण महापुजा
दुपारी 12 वाजता – श्री ची महाआरती
दुपारी 1 वाजता – भजनाचा कार्यक्रम
दुपारी 4.30 वाजता – श्री ची मिरवणूक – टाळकरी विद्यार्थी  सहभाग, आळंदी
सायंकाळी 7 वाजता – विनोदाचार्य
युवा किर्तनकार ह.भ.प.अक्षय महाराज पिंगळे (महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार) त्यांना कीर्तनसाथ श्री संत नगद नारायण महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची तसेच गुरुबंधू आळंदीकर यांची असणार आहे.
सर्व नागरिक व भाविकांनी श्री दर्शन व कीर्तन श्रवणाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बालविकास मित्र मंडळाकडून करण्यात आले ( Vadgaon Maval ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.