Nigdi : ओटास्कीम येथे भंगारच्या दुकानाला आग; कोणतीही जीवित हानी नाही

एमपीसी न्यूज – निगडी परिसरातील ओटा स्कीम येथे भंगारच्या दुकानाला ( Nigdi)  आग लागली. ही घटना रविवारी (दि. 26) पहाटे घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

Maharashtra : अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणाच्या उपोषणावेळी झालेल्या दगडफेक प्रकरणी तिघांना अटक

अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओटास्कीम येथे रविवारी पहाटे भंगारच्या दुकानाला आग लागली. या घटनेची वर्दी सकाळी सव्वा सहा वाजता अग्निशमन विभागाला मिळाली. त्यानुसार मुख्य अग्निशमन केंद्रासह इतर सर्व उपकेंद्राचे बंब घटनास्थळी दाखल झाले. भंगारच्या दुकानात आग लागून आगीचे लोट हवेत उडत होते. या आगीमुळे परिसरातील घरे व दुकानांना देखील झळ पोहोचत होती.

अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन ते तीन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीमुळे भंगारच्या दुकानात शेजारी असलेले सलूनचे दुकान आणि श्रीयुत शिंदे यांच्या घराचे नुकसान झाले आहे.

भंगारचे दुकान पूर्णपणे जळून खाक झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचा देखील अंदाज व्यक्त केला जात ( Nigdi)  आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.