Kerala : कोचिन विद्यापीठात म्युजिक कॉन्सर्टच्या कार्यक्रमावेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – केरळच्या कोचिन विद्यापीठात  म्युजिक कॉन्सर्टच्या ( Kerala) कार्यक्रमावेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून 64 जण जखमी झाल्याची  खळबळजनक माहिती समोर आली आहे. विद्यापीठातील ओपन-एयर ऑडिटोरियममध्ये हा कार्यक्रम सुरु होता.

Maharashtra : अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणाच्या उपोषणावेळी झालेल्या दगडफेक प्रकरणी तिघांना अटक

विद्यापीठात टेक फेस्टचे आयोजन करण्यात आलं होतं आणि गायिका निकिता गांधी कॅम्पसमध्ये असलेल्या खुल्या सभागृहात सादर करत होत्या. यावेळी अचानक पाऊस सुरु झाला. त्यामुळे कार्यक्रमात उपस्थित असणारे प्रेक्षक आतमध्ये सभागृहाच्या दिशेला पळाले. अचानक पाऊस सुरु झाल्याने प्रेक्षकांची भंबेरी उडाली. प्रेक्षक सैरावैरा सभागृहाच्या दिशेला पळाले. यामुळे मोठा गदारोळ झाला. चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाली.

या घटनेत दोन विद्यार्थी आणि दोन विद्यार्थीनींचा मृत्यू झाला. तसेच तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. या चेंगराचेंगरीत 15 विद्यार्थी बेशुद्ध झाले आहेत. या घटनेत ज्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय त्यांना कलामासेरी मेडिकल कॉलेजला नेण्यात आले आहे. संबंधित घटना काल ( दि.25 नोव्हेंबर) संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. विद्यापीठाचा टेक फेस्टचा काल शेवटचा ( Kerala) दिवस होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.