No water cut : सणासुदीच्या काळात पाणीपुरवठा बंद नको : दीपाली धुमाळ

एमपीसी न्यूज : सणासुदीच्या काळात पुण्यात पाणीपुरवठा बंद नको, अशी मागणी महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ यांनी केली आहे. (No water cut) बुधवार दि 5 ऑक्टोबर रोजी हिंदु संस्कृती मधील महत्वाचा सण म्हणजे दसरा (विजयादशमी) आहे, अशा सणासुदीच्या वेळी नागरिकांना जर पुरेसे पाणी मिळाले नाही तर नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होईल.त्यामुळे पुणे शहरातील गुरुवारचा बंद  पाणीपुरवठा रद्द करा, अशी मागणीही दिपाली धुमाळ यांनी केली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा प्रशासनाने पूणे शहरातील पाणी पुरवठा विद्युत विषयक कामे करण्यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे.(No water cut) खर तर ज्या दिवशी पाणी पुरवठा बंद असेल त्या दिवसाच्या आदल्या दिवसापासुन ते पुढील दोन तिन दिवस नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा मिळत नाही.

Alandi news : दसऱ्या निमित्त आळंदीतील रस्ते झेंडूच्या फुलांनी सजले

त्याचबरोबर आधीच  प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार पूर्वीपेक्षा दोन तास पाणी पुरवठा कमी होत आहे. त्याचबरोबर गेले अनेक दिवसापासुन पुणे शहरात समान पाणी पुरवठा यचजने अंतर्गत एल अ‍ॅन्ड टी मार्फत पाईपलाईनचे काम फार मोठ्या संथ गतीने ढिसाळ पध्दतीने काम सुरू आहे,(No water cut) त्यामुळे सुध्दा नागरिकांना पाणीपुरवठा कमी होत आहे. तरी आपणास विनंती गुरुवारचा बंद पाणीपुरवठा रद्द करून सुरळीत पाणी पुरवठा करावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.