Alandi news : दसऱ्या निमित्त आळंदीतील रस्ते झेंडूच्या फुलांनी सजले

एमपीसी न्यूज : दसऱ्या निमित्त आळंदी येथील विविध ठिकाणी असणारी रस्त्याच्या कडेची दुकाने झेंडूंच्या फुलांनी, आपट्यांच्या व आंबाच्या पानांनी सजलेली दिसून येत आहेत. (Alandi news) या फुलांच्या खरेदीसाठी शहरात विविध ठिकाणी रस्त्यांवर लोकांची गर्दी दिसून येत आहे.

आळंदी मध्ये मरकळ रस्ता, प्रदक्षणा रस्ता,चावडी चौक,चाकण चौक ,वडगांव रस्त्या अश्या इ. विविध ठिकाणी दसऱ्या निमित्त काही शेतकरी वर्ग व व्यावसायिक विक्रेते मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला तात्पुरती स्वरूपाची दुकाने लावत झेंडूंची फुले घेऊन विक्री साठी बसलेले दिसून आले.

Matrimonial site fraud : मॅट्रीमोनिअल साईटवरून तरुणीची फसवणूक

मंगळवारी सकाळी आळंदी येथे झेंडूच्या एक किलो फुलांचा भाव 80 ते 100  रुपये इतका होता. दसऱ्या निमित्त प्रथा परंपरे नुसार दारोदारी झेंडूच्या फुलांचे तोरण बांधण्यासाठी, देवपूजा, वाहन,शेती औजारे,घरातील वह्या पुस्तके, शस्त्र (सूरी विळी इ.),साहित्य,यंत्रांचे पूजन,मंदिर सजावट करण्यासाठी (Alandi news) तसेच दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर ठीक ठिकाणी शुभ  समारंभ असतात अश्या विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात या फुलांचा वापर होत असतो. यामुळे या फुलांच्या खरेदीसाठी शहरात  विविध ठिकाणी रस्त्यांवर लोकांची गर्दी दिसून येत होती.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.