Pimpri News : पिंपरी येथे भरणार एक दिवसीय कायदे विषयक मार्गदर्शन शिबिर व स्नेह मेळावा

एमपीसी न्यूज  – राष्ट्रीय श्रमीक आघाडी (महाराष्ट्र राज्य) आणि पिंपरी-चिंचवड वकिल संघटना यांचे संयुक्त विद्यमाने पहिल्यांदाच यावर्षी एक दिवसीय कायदे विषयक मार्गदर्शन (Pimpri News) शिबिर व स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हे शिबिर येत्या रविवारी म्हणजे 11 डिसेंबर रोजी पिंपरीतील सावित्रीबाई फुले सभागृहात सकाळी अकरा ते दुपारी दोन या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे, अशी माहिती राष्ट्रीय श्रमीक आघाडी संघटनेचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी दिली आहे.

या शिबिराचे उद्घाटन पिंपरी-चिंचवड माहापालिकेचे आयुक्त शेखर सिंह करणार आहेत. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय श्रमीक आघाडी संघटनेचे अध्यक्ष यशवंत भोसले,स्वागत अध्यक्ष म्हणून पिंपरी-चिंचवड वकील संघटनेचे माजी अध्यक्ष ॲड. सुशील मंचरकर हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी पिंपरी-चिंचवड वकील संघटनेचे नवनिर्वाचीत अध्यक्ष ॲड. नारायण रसाळ,उपाध्यक्ष ॲड. जयश्री विलास कुटे,सचिव ॲड. गणेश अंकुश शिंदे,महिला सचिव ॲड. प्रमिला हरीश गाडे,सह सचिव  ॲड. मंगेश मच्छिंद्र नढे,खजिनदार ॲड. विश्वेश्वर शांताराम काळजे,ऑडिटर ॲड.  रमेश रणपिसे तसेच कार्यकारीणी सदस्य ॲड. स्वप्नील  वाळुंज,ॲड. अक्षय भगवान केदार,ॲड.सौरभ संजय जगताप,ॲड. नितीन भाऊसाहेब पवार ,ॲड. पवन विलास गायकवाड,ॲड. प्रशांत विष्णु बचूटे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार कऱण्यात येणार आहे. या शिबीरासाठी सुमारे 250 वकील बांधव उपस्थित राहणार आहेत.

Talegaon News : तळेगावात हातात कोयता घेऊन दहशत पसरणाऱ्या तरुणाला अटक

या सत्कारानंतर ज्येष्ठ विधि तज्ञ डॉ. उदय वारुंजीकर हे वकिलांसाठी नवीन संधी या विषयावर तर विधी तज्ञ डॉ. ॲड. राजेंद्र अनभुले हे मेहरबान सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची (Pimpri News) अंमलबजावणी या विषयावर तसेच ॲड प्रशांत क्षीरसागर हे प्रलंबित न्यायालयीन प्रक्रियेवर अमंलबजावणी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.याबरोबरच ॲड नारायण रसाळ हे शेवटी अध्यक्षीय आढावा सांगणार आहेत. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पिंपरी-चिंचवड वकिल संघटनेचे माजी अध्यक्ष ॲड. सुहास पडवळ करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.