Talegaon News : तळेगावात हातात कोयता घेऊन दहशत पसरविणाऱ्या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज हातात कोयता घेऊन येणाऱ्या जाणाऱ्यांना शिवीगाळ करत दहशत पसरविणाऱ्या तरुणाला तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली आहे.(Talegaon News) ही कारवाई गुरुवारी (दि. 8) सायंकाळी पावणे पाच वाजता गोळवणकर मैदानाजवळ तळेगाव दाभाडे येथे करण्यात आली.

वैभव रामकृष्ण विटे (वय 26, रा. तळेगाव दाभाडे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार विकास तारू यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Nigdi News : रामनामाने दोषांचे परिमार्जन होते  – ह.भ.प. विश्वास कुलकर्णी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक तरुण कोयता घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी कारवाई करत वैभव विटे याला ताब्यात घेतले.(Talegaon News) वैभव हा शिवाजी चौक तसेच गोळवणकर मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर थांबून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अडवून शिवीगाळ करत होता. तो सार्वजनिक शांततेचा भंग करत असल्याने त्याच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

काही दिवसांपूर्वीच तळेगाव खून प्रकरणाने हादरले होते. त्यानंतर या प्रकाराने नागरिकांमध्ये दहशत पसरत असून शहराचा गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.