Nigdi News : रामनामाने दोषांचे परिमार्जन होते  – ह.भ.प. विश्वास कुलकर्णी

एमपीसी न्यूज- मानवी जीवनात आसक्तीमुळे अनेक दोष निर्माण होतात; परंतु रामनामाने दोषांचे परिमार्जन होते!” असे विचार ह.भ.प. विश्वास कुलकर्णी (Nigdi News) यांनी समर्थ रामदासस्वामी यांच्या श्लोकावर निरूपण करताना व्यक्त केले.

निगडी प्राधिकरण येथील श्रीराम मंदिर, पेठ क्रमांक 27 येथे गुरुवारी (दि.8) व्यक्त केले. यावेळी पाच दिवसीय नारदीय परंपरेतील कीर्तन महोत्सवात प्रथम पुष्पाचे निरूपण ह.भ.प. विश्वास कुलकर्णी यांनी केले. मुख्य संयोजिका माजी नगरसेविका शर्मिला बाबर, भाजपा शहर चिटणीस राजेंद्र बाबर, विजय शिनकर, रवींद्र बोर्लीकर, अंजली पाटील, राधिका बोर्लीकर, सुभाष भंडारे यांची आदी उपस्थित होते.

विश्वास कुलकर्णी म्हणाले की, “मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही मनाची चतुष्टये आहेत. मानवी मन हे चंचल आहे. ते सतत विषयांचे चिंतन करते. त्यामुळे कामासक्ती वाढते.(Nigdi News) काम पूर्ण न झाल्याने क्रोध निर्माण होतो. क्रोधातून अहंकार उत्पन्न होतो. त्यामुळे मानवी जीवनाची खूप मोठी हानी होते. चंचल मनाला स्थैर्य प्राप्त व्हावे म्हणून प्रात:काळी देवाचे नाम अन् रूपचिंतन केल्यास जीवनात गती अन् प्रगती प्राप्त होते.

Pimpri News : आय ई सी संस्थांच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी क्षमता बांधणी कार्यशाळा 

कीर्तनाच्या पूर्वरंगात त्यांनी ययाती, रावण या पौराणिक व्यक्तिरेखांच्या काम दोषांचे विवेचन केले; तर उत्तररंगात तुलसीदास आख्यान कथन करताना, “कामातुर तुलसीदासाने पत्नीने केलेला रामनामाचा उपदेश आचरणात आणल्याने त्यांचे संत तुलसीदासात रूपांतर झाले; आणि ‘रामचरितमानस’सारखा अप्रतिम ग्रंथ त्यांनी सिद्ध केला!” असे विविध श्लोक, अभंग, भक्तिगीते उद्धृत करीत अतिशय रसाळ शैलीतून कुलकर्णी यांनी आपल्या निरूपणाद्वारे सांगत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

त्यांना कानिफनाथ घैसास (तबला), धनवर्षा प्रभुणे (संवादिनी) यांनी साथसंगत केली. श्रीराम मंदिर विश्वस्त मंडळाने संयोजनात सहकार्य केले. संजय दातार यांनी सूत्रसंचालन केले.(Nigdi News) सरस्वती प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलनाने महोत्सवाचा प्रारंभ आणि सामुदायिक आरतीने प्रथमपुष्पाचा समारोप करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.