Chikhali theft : चिखली येथे शटर उचकटून कपड्याच्या दुकानात चोरी

एमपीसी न्यूज – चिखली येथे कपड्याच्या दुकानाचे शटर उचकटून दुाकानातून एक लाख रुपयांचे कपडे चोरीला गेलेले आहेत. (Chikhali theft) हा प्रकार बुधवारी (दि.26) रात्री दहा नंतर म्हात्रे वस्ती येथील भावना कलेक्शन येथे घडला.

दिपक भरत रानावत (वय 35 रा. आकुर्डी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Khed news : खेड मधील शेतक-यांचा काळूस येथे 30 ऑक्टोबरला मेळावा 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी फिर्यादी यांनी दुकान बंद करून गेले असता अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश करत दुकानातील (Chikhali theft) कपडे व रोख रक्कम असे एकूण 1 लाख 10 हजार रुपयांचा एवज चोरून नेला आहे. यावरून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.