Sunil mane : चिखलवाडीच्या संयुक्त विकास आराखड्या संदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे आदेश  

एमपीसी न्यूज – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वात पहिल्यांदा साजरी करणाऱ्या चिखलवाडी साठी संयुक्त विकास आराखडा तयार करावा, अशी मागणी भाजप पुणे शहर चिटणीस (Sunil mane) सुनील माने यांनी समाजकल्याण आयुक्त यांच्याकडे केली होती. याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश राज्याचे समाजकल्याण उपायुक्त रविंद्र कदमपाटील यांनी समाजकल्याणचे प्रादेशिक उपायुक्त व सहायक आयुक्त यांना दिले आहेत.

मागासवर्गीय समाजाच्या विविध समस्यासंदर्भात सुनील माने यांनी समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी या समस्या सोडवण्यासाठी समाजकल्याण आयोगाने पुढाकार घ्यावा अशी विनंती केली होती. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वात पहिल्यांदा साजरी करणाऱ्या चिखलवाडीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी समाजकल्याण विभागामार्फत संयुक्त विकास आराखडा तयार करावा तसेच येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मृतीस्थळ करावे अशी विनंती निवेदनाद्वारे केली होती.

Dhamma Melawa : धम्म मेळाव्यासाठी पिंपरीतील एच.ए. मैदानावर तयारी सुरु

यावेळी त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पहिल्यांदा 14 एप्रिल 1928 साली जगात पहिल्यांदा पुणे शहरातील चिखलवाडी येथे साजरी केली होती. (Sunil mane) याचा दाखला देऊन हे ऐतिहासिक स्थळ असल्याने चिखलवाडी तसेच आसपासच्या परिसराचा पायाभूत सुविधा,शैक्षणिक विकास, रस्ते व आरोग्य विकास करण्यासाठी विशेष कृती आराखडा करावा अशी मागणी केली होती.

याबाबत समाजकल्याण आयुक्त यांनी सकारात्मकता दाखवत चिखलवाडी आंबेडकर स्मृतिस्थळासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली होती.(Sunil mane) याबाबत समाजकल्याण आयुक्तालयाने आदेश काढून सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. माने यांनी याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्याचबरोबर खासदार गिरीश बापट यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा नियोजन आराखड्यातून यासाठी निधी देण्याबाबत पत्र दिले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.