Dhamma Melawa : धम्म मेळाव्यासाठी पिंपरीतील एच.ए. मैदानावर तयारी सुरु

एमपीसी न्यूज – धम्मचक्र प्रवर्तन (Dhamma Melawa) दिनानिमित्त शनिवारी (दि.15) पिंपरी येथील एच.ए. च्या मैदानात ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा धम्म मेळावा पार पडणार आहे. यासाठी तयारी करण्यात येत आहे.

या सभेतून प्रकाश आंबेडकर जनतेशी संवाद साधणार आहेत. या धम्म मेळाव्यात भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर, अंजली आंबेडकर, बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर, रेखा ठाकूर, अशोक सोनोने आदी उपस्थित राहणार आहेत.

भारतीय बौद्ध महासभा, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व बौद्ध समाज विकास महासंघाच्या वतीने या धम्म मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे. भारीपचे माजी शहराध्यक्ष अतुल बहुले यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य धम्म रॅली सुद्धा आयोजित करण्यात आली आहे.

अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या स्वागतासाठी (Dhamma Melawa) आयोजित केलेल्या धम्म बाईक रॅलीसाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागातील अनुयायी महात्मा फुले वाडा येथे एकत्र जमतील. त्यानंतर आण्णाभाऊ साठे पुतळा सारसबाग, स्वारगेट, बसवेश्वर महाराज पुतळा बाजीराव रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (SSPMS) शिवाजीनगर मार्गे संचेती हॉस्पिटल चौक, संगमवाडी ब्रिज दापोडी, पुणे मुंबई जुना हायवे, भगतसिंग पुतळा बोपोडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा पिंपरी इथून महात्मा फुले पुतळा पिंपरी व एच ए मैदान इथे या रॅलीचा समारोप होणार आहे.

TDO : राज्य शासनातर्फे टीओडीला मंजुरी

नितीन शेलार, नवनीत अहिरे, अजित पानसरे, संदीप चौधरी, अजित वाघमारे, भुषण भवर, सचिन शिंदे, ओंकार कांबळे, नितीन कांबळे हे या धम्म बाईक रॅलीच्या जय्यत तयारीसाठी मेहनत घेत आहेत. तसंच या भव्य धम्म बाईक रॅलीमध्ये जास्तीत जास्त अनुयायींनी सहभागी होऊन पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून व पंचशील ध्वज घेऊन उपस्थित रहावे. तसेच रॅलीसाठी दुचाकी व चारचाकी वाहनासह शनिवारी (दि.15) दुपारी दोन वाजता उपस्थित रहावे असं देखील आवाहन करण्यात येतंय.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.