Pune : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने भगवान महावीर विश्वशांती रॅलीचे आयोजन

एमपीसी न्यूज  : तीर्थंकर भगवान महावीर यांच्या 2622 व्या जन्मकल्याणक निमित्त सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने भगवान महावीर विश्वशांती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. (Pune) संपूर्ण जगाला अहिंसा, दया, क्षमा, शांती, मैत्री, जगा आणि जगू द्या हा संदेश देणारे भगवान महावीर यांच्याबद्दल विद्यार्थ्यांनी भाषण केले. तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

सूर्यदत्त नॅशनल स्कूलच्या संचालक शीला ओक यांच्या नेतृत्वात सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने बावधन परिसरात ही रॅली निघाली. त्यातून परिसरातील नागरिकांना जगा आणि जगू द्या तसेच ‘अहिंसा परमो धर्म’ हा संदेश देण्यात आला. विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी ‘जियो और ‘जीने दो’ तसेच ‘अहिंसा परमो धर्म:’ या घोषणा दिल्या. विद्यार्थी-शिक्षकांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व संस्थेशी संलग्न सदस्यांना प्रा.डॉ. संजय बी. चोरडिया संस्थापक व अध्यक्ष सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन, सुषमा चोरडिया उपाध्यक्षा (Pune) सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन यांनी भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

Pune : मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील

प्रा. डॉ. संजय बी चोरडिया आपल्या संदेशात म्हणाले, “आज विश्व युक्रेन रशिया युद्ध, जागतिक महामंदी, कोरोना नंतरचा तणाव, काळ अशा एका तणावपूर्ण आणि अशांत काळातून संक्रमण करत आहे. माणसाच्या जीवनमानावर एक मोठा आघात झाला आहे. या सर्वांतून सावरण्यासाठी भगवान महावीर यांचा शांतीचा, अहिंसेचा, प्रेमाचा संदेशच उपयोगी ठरू शकतो. सूर्यदत्त परिवाराला त्यांच्या संदेशाचे भान असावे याकरिता भगवान महावीर सभागृहामध्ये सातत्याने विविध उपक्रमाचे आयोजन केले जाते.”

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन च्या सहायक उपाध्यक्षा स्नेहल नवलखा यांनीही मार्गदर्शन केले. अनुपमा नेवरेकर, अपर्णा नायर, विजय पोटेकर, नंदिनी शांती कोंडा, सारिका देवरे, नम्रता चौधरी, (Pune) प्राजक्ता पाटकर, सविता डाके, नेहा पवार आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूर्यदत ग्लोबल पीस रिसर्च सेंटरचे या उपक्रमात सहकार्य लाभले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.