Pune : मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील

एमपीसी न्यूज : पुणे शहरासाठी महत्वाचा असणारा मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्प मनपाकडून हाती घेण्यात आला होता. हा प्रकल्प 2018 मध्ये तयार करण्यात आला होता. (Pune) प्रकल्पाच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील मुळा, मुठा आणि मुळा-मुठा या 44 किलोमीटर अंतराच्या या नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन हजार 619 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले होते. दरम्यान, या प्रकल्पाविरोधात पर्यावरणप्रेमींनी काही आक्षेप घेत राष्ट्रीय हरित लवादाकडे (एनजीटी) धाव घेतली.

मुळा-मुठा सुधार हा शहरासाठी महत्वकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. पर्यावरणप्रेमींच्या आक्षेपामुळे सात हजार कोटींचा नदी सुधार प्रकल्प थांबला. प्रकल्प राबविण्यासाठी पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा दावा पर्यावरणप्रेमींनी केला होता. तसेच या प्रकल्पात सहा हजार झाडे तोडली जाणार असल्याचा आरोपही करण्यात येत होता. त्यानुसार पर्यावरणप्रेमींनी राष्ट्रीय हरित लवादाकडे (NGT) याचिका दाखल केली होती.

Pimpri : पिंपरीमध्ये आणखी दोन ठिकाणी ईडीचे छापे

दरम्यान, पर्यावरणप्रमींची याचिका राष्ट्रीय हरित लवादाने नोव्हेंबर 2022 मध्ये फेटाळलेली आहे. त्यानंतर पर्यावरणप्रेमींनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. (Pune) आता सर्वोच्च न्यायालयानेही ही याचिका फेटाळली आहे. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागणार असल्याचे मोहळ यांनी नमूद केले आहे. हा प्रकल्प दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.