Pavana Bank election : पवना बँकेच्या निवडणुकीसाठी अण्णासाहेब मगर सहकार पॅनल जाहीर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वात जुनी बँक असलेल्या ( Pavana Bank election) पवना सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी  माजी आमदार ज्ञानेश्‍वर लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनेल जाहीर करण्यात आले आहे. त्यांच्या अण्णासाहेब मगर सहकार पॅनलमधून 19 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. जुने-नवे असा समतोल साधून संचालकपदासाठी उमेदवार दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील पवना सहकारी बँक ही सर्वात जुनी बँक आहे. या बँकेची स्थापना शहराचे भाग्यविधाते दिवंगत अण्णासाहेब मगर यांनी केलेली आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात बँकेला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. या बँकेवर माजी आमदार ज्ञानेश्‍वर लांडगे यांचे किंवा त्यांना मानणाऱ्या विचारांचे संचालक मंडळ सर्व काळ सत्ता पदावर राहिलेले आहे. माजी आमदार ज्ञानेश्‍वर लांडगे हे सर्वांना बरोबर घेऊन जातात.  सर्व पक्षीयांबरोबर त्यांचे चांगले संबंध आहेत.

 

 

Pimpri News : लेहरायेगा तिरंगा या देशभक्तीपर गीताला सर्वोत्कृष्ट गीत म्हणून पुरस्कार

पवना सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची 2022-23 ते 2027-28 या काळासाठीची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. 9 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. माजी आमदार ज्ञानेश्‍वर लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अण्णासाहेब मगर सहकार पॅनल जाहीर करण्यात आले आहे. सर्वसाधारण गटातून ज्ञानेश्‍वर लांडगे, विठ्ठल काळभोर, शांताराम गराडे, जयनाथ काटे, शिवाजी वाघेरे, शामराव फुगे, शरद काळभोर, सचिन चिंचवडे, अमित गावडे, चेतन गावडे, सुनील गव्हाणे, जितेंद्र लांडगे, बिपीन नाणेकर, सचिन काळभोर तर अनुसूचित जाती गटातून दादू डोळस, महिला राखीव गटातून जयश्री गावडे, उर्मिला काळभोर, इतर मागासवर्गीय गटातून वसंत लोंढे ( Pavana Bank election)आणि भटक्या विमुक्त जाती गटातून संभाजी दौडकर यांचा पॅनेलमध्ये समावेश आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.