Pavana Dam Update : धरणात 92.27 टक्के पाणीसाठा; 1400 क्यूसेक्सने विसर्ग

एमपीसी न्यूज – पवना धरण 92.27% भरले (Pavana Dam Update) आहे. त्यामुळे  विज निर्मिती ग्रुहद्वारे पवना नदीमध्ये सकाळी 11:00 वाजता 1400 क्यूसेक्स विसर्ग करण्यात येणार आहे. तसेच धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता येत्या 24 ते 48 तासांमध्ये पवना धरणाच्या सांडव्यावरून पवना नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नदी काठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन केले आहे.

पवना नदी काठच्या सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते, की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत.

GST Collection: देशात जुलैमध्ये 65,105 कोटी रुपये जीएसटी संकलित; 11% वार्षिक वाढ

सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात. सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी व पाटबंधारे विभागास सहकार्य करावे असे आवाहन पवना धरण पूरनियंत्रण कक्षाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.