PCMC : ऑनलाइन कर भरणा वाढला; अडीच लाख मालमत्ताधारकांकडून 376 कोटींचा भरणा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व (PCMC) कर आकारणी विभागाने नागरिकांसाठी कर भरण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देऊन करामध्ये सवलतही दिली आहे. या सुविधेला मालमत्ताधारकांचा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे 2 लाख 59 हजार मालमत्ताधारकांनी तब्बल 376 कोटी 70 लाख 89 हजार रूपयांचा ऑनलाइन कर भरणा केला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या जमिनी अशा 6 लाख 7 हजार मिळकती आहेत. यामध्ये पहिल्या सहामहीत 3 लाख 66 हजार 636 मालमत्ता धारकांनी 580 कोटी कराचा भरणा केला आहे.

यामध्ये तब्बल 3 लाख 22 हजार 758 निवासी मालमत्ता, त्यानंतर (PCMC) 29 हजार 778 बिगर निवासी, 8 हजार 391 मिश्र, 2 हजार 787 औद्योगिक तर 2 हजार 875 मोकळ्या जमीन असणाऱ्या मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला आहे.

Talegaon News : … तरीही मुख्याधिकारी म्हणतात, ‘ऑल इज वेल!’
मात्र, यामध्ये 2 लाख 59 हजार 24 मालमत्ता धारकांनी विविध ऍप आणि ऑनलाइन असा 376 कोटी 70 लाख 89 हजार रूपयांचा कर जमा केला आहे. त्यानंतर 63 हजार 305 जणांनी 74 कोटी 54 लाख रोख, 15 हजार 749 जणांनी 57 कोटी 43 लाख धनादेशाव्दारे, 433 जणांनी 26 कोटी 46 लाख आरटीजीएसव्दारे, 756 जणांनी एनईएफटीव्दारे 4 कोटी 54 लाख तर 435 जणांनी डीडीच्या माध्यमातून 3 कोटी 64 लाखा रूपयांचा भरणा केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.