Today’s Horoscope 06 October 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 06 October 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – शुक्रवार.

06.10.2023.

शुभाशुभ विचार- चांगला दिवस. 

आज विशेष- अष्टमी श्राद्ध, कालाष्टमी.

राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र – आर्द्रा 21.32 पर्यंत नंतर पुनर्वसू

चंद्र राशी – मिथुन.

————————————

मेष – ( शुभ रंग- डाळिंबी )

आज एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होणार आहे. रिकामटेकडी चर्चा फक्त वादास कारणीभूत होईल. शेजाऱ्यांशी एकोपा वाढेल. घराबाहेर मात्र आज वाद संभवतात.

वृषभ (शुभ रंग- राखाडी )

आज तुमचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असेल. गरजेपुरता पैसा सहज उपलब्ध होईल. गृहिणी कौटुंबिक जबाबदाऱ्या आनंदाने पार पाडतील. आनंदी दिवस.

मिथुन ( शुभ रंग- मोरपंखी )

कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध निर्माण होतील. उपवारांना स्थळे सांगून येतील. आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ व पैसा खर्च कराल. आज इतरांच्या भानगडीत मध्यस्थी कराल.

कर्क (शुभ रंग- हिरवा )

खर्चाचे प्रमाण वाढले असले तरीही पैसा कमी पडणार नाही. कलाकारांचा प्रदेशात नावलौकिक होईल. आज प्रवासात असाल तर मात्र आपल्या किमती वस्तूंची काळजी घ्या. सतर्क रहा.

सिंह (शुभ रंग- आकाशी )

पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून चांगला परतावा पदरात पडेल. तुमचे कष्ट कारणी लागतील व कार्यक्षेत्रात यशाची चाहूल लागेल. आज दिवसाचा उत्तरार्ध लाभाचा राहील.

कन्या ( शुभ रंग- गुलाबी)

नोकरदारांना वरिष्ठांचे दडपण असेल. अधिकारी वर्गास अधिकार वापरावेच लागतील. कार्यक्षेत्रात अविश्रांत कष्ट करण्याची तुमची आज तयारी असेल. अति व्यस्त दिवस.

तूळ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

आज उद्योगधंद्याच्या दृष्टीने थोडा विरोधी दिवस असून नोकरीत तुम्हाला साहेबांचे मूळ सांभाळावे लागतील. कार्यक्षेत्रात काही आकस्मिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

वृश्चिक (शुभ रंग-तांबडा)

आज फक्त आपल्याच भल्याचा विचार करा. भावनेच्या भरात कुणालाही वचने देऊ नका. जोडीदाराच्या चुका काढण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. संध्याकाळी गाडी हळू चालवा.

धनु- (शुभ रंग- जांभळा )

आज वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी असणार आहे. महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात जोडीदाराचे मत अवश्य घ्या. हौस मौज करताना कायद्याचे उल्लंघन करू नका.

मकर ( शुभ रंग- सोनेरी )

आज कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाकणे गरजेचे आहे. हितशत्रू सक्रिय असल्याने नोकरीतही नियमांचे उल्लंघन करू नका. हाताखालच्या लोकांवर वचक गरजेचा आहे.

कुंभ (शुभ रंग – पांढरा)

आज तुमचा चैन करण्याकडे कल राहील. उंची वस्त्र खरेदी कराल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय तेजीत चालतील. कलावंतांना उत्तम संधी चालून येतील.

मीन -(शुभ रंग – निळा)

स्थावर शेतीवाडी संबंधित काही रखडलेले व्यवहार असतील तर ते आज मार्गी लागू शकतात. मुलांची अभ्यासात एकाग्रता राहील. गृहिणींना आज माहेरची ओढ लागेल.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क – 9689165424.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.