PCMC : सहा महिन्यांत 60 टक्के मालमत्तांचा कर वसूल,  580 कोटी तिजोरीत

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) कर संकलन व कर आकारणी विभागाने पालिकेच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात प्रथमच सहा महिन्यांत विक्रमी अशी कर वसुली केली आहे. सहा महिन्यांत 60  टक्क्यांपेक्षा जास्त करदात्यांकडून तब्बल 580 कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात यश मिळविले आहे. दुसरीकडे वारंवार आवाहन करूनही कर न भरणाऱ्या मालमत्ता धारकांना आजपासून दोन टक्के विलंब शुल्क लागू होणार आहे. तर थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठी तीव्र मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

Talegaon : गाडीला कट मारल्याचा जाब विचारत कार चालकाला मारहाण

दरम्यान, गतवर्षी सप्टेंबर अखेरपर्यंत 2 लाख 45 हजार 844 मालमत्ता धारकांनी 364 कोटींचा तर यंदा सप्टेंबर अखेरपर्यंत 3 लाख 66 हजार 636 मालमत्ता धारकांनी 579 कोटी रुपयांचा कर भरला आहे.

म्हणजे गतवर्षीपेक्षा 1 लाख 20 हजार 792 मालमत्ता धारकांनी सहा महिन्यांत कराचा भरणा केला आहे.  शहरात निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या जमीन अशा  6 लाख 7 हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत.  या मालमत्ता धारकांकडून महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभाग कर वसूल करत आहे.

गतवर्षी या विभागाच्या वतीने राबविलेल्या विविध उपक्रम, जनजागृती, जप्ती मोहीम, मालमत्ता धारकांना नोटीसा, नळ कनेक्शन बंद करणे, थकबाकीदारांची वृत्तपत्रात नावांची यादी प्रसिद्ध करणे यासह यंदा महिला बचत गटांच्या माध्यमातून बिलांचे घरपोच वाटप, रिक्षाव्दारे जनजागृती, महत्त्वाच्या चौकात होर्डिंग्ज, रिल्स स्पर्धा, सोशल मीडियाचा प्रभावी वापर याचबरोबर प्रत्येक व्यक्तीला त्याची मालमत्ता कराची रक्कम आणि सवलतीची रक्कम सांगणारा customised sms पाठवला जात होता. अशा विविध बाबींमुळे 2023-24 च्या पहिल्या सहामाहीत 580 कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात विभागाला यश आले आहे.

6 लाख 7 हजार मालमत्ता धारकांपैकी 3 लाख 66 हजार 636 मालमत्ता धारकांनी म्हणजे 60 टक्के मालमत्ता धारकांनी विविध कर सवलतींचा लाभ घेत सहा महिन्यांत कराचा भरणा (PCMC) केला आहे. या मालमत्ता धारकांनी 579 कोटी 62 लाख 62 हजार रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा केला आहे.

असा आला रूपया
ऑनलाईन – 370 कोटी  83 लाख
विविध ॲप – 5 कोटी 87 लाख
रोख.       –  74 कोटी 54 लाख
धनादेशाद्वारे – 57 कोटी 43 लाख
आरटीजीएस – 26 कोटी 46 लाख
इडीसी-  6 कोटी 46 लाख
एनईएफटी – 4 कोटी 54 लाख
डीडी-     3 कोटी 64 लाख

कर भरण्यात निवासी मालमत्ताधारकांची आघाडी

3 लाख 66 हजार 636 मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला आहे. यामध्ये तब्बल 3 लाख 22 हजार 758 निवासी मालमत्ता धारकांनी आपल्या कराचा भरणा केला आहे. त्यानंतर 29 हजार 778 बिगर निवासी, 8 हजार 391 मिश्र, 2 हजार 787 औद्योगिक तर 2 हजार 875 मोकळ्या जमीन असणाऱ्या मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला आहे.

वाकड, सांगवी, चिंचवड, थेरगावमध्ये कर भरणाऱ्यांची संख्या अधिक

कर संकलनासाठी शहरात 17 झोन आहेत. यामध्ये वाकड झोनमध्ये सर्वाधिक 48हजार 575, सांगवीमध्ये 40 हजार 341, थेरगावमध्ये 33 हजार 838 तर चिंचवडमध्ये 33 हजार 715 मालमत्ता धारकांनी आपल्या कराचा भरणा केला आहे. तर सर्वात कमी तळवडे झोनमध्ये 5 हजार 140 मालमत्ता धारकांनी कर भरला आहे.

41 हजार जणांना जप्ती नोटीसा तर 36 हजार मालमत्ता धारकांना जप्ती पत्र

2023-24 या आर्थिक वर्षात आत्तापर्यंत कर संकलन विभागाने 41 हजार, 307 जणांना जप्ती नोटीसा तर 36 हजार 719 मालमत्ता धारकांना जप्ती पत्रे धाडली आहेत. या मालमत्ता धारकांकडे तब्बल 671 कोटी रुपयांचा कर थकीत आहे.

महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने यंदा मालमत्ता करांची बिले वाटप महिला बचत गटांतील महिलांना देण्याचे ठरवले होते. याला प्रकल्प सिद्धी असे नाव (PCMC) देण्यात आले. हा निर्णय महिला बचत गटांनी सार्थ ठरविला आहे. महिलांनी शंभर टक्के बिलाचे वाटप केले.

त्यामुळे नागरिकांनी  पहिल्या सहामाहीत कर भरण्यास प्राधान्य दिले. मालमत्ता नोंद अभियानाने वेग घेतला आहे. यातही शहरातील महिला बचत गटातील महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून दिला आहे. नागरिकांनी आपल्या मालमत्तांची अचूक नोंद होण्यासाठी या अभियानाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले.

सहा महिन्यांत 60 टक्यांपेक्षा जास्त मालमत्ता धारकांनी आपल्या कराचा भरणा केला आहे. त्यामुळे आता आर्थिक वर्षातील 6 महिन्यात उर्वरित 40 टक्के मालमत्ता धारकांकडून कर संकलन करण्यासाठी लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

यामध्ये प्रामुख्याने अनेक वर्षांपासून थकीत असलेला कर वसूल आणि चालू कर 100 टक्के वसुली करणे हेच विभागाचे एकमेव ध्येय असणार आहे. यासाठी मालमत्ता जप्त करण्यासारखा कटू निर्णय घ्यावा लागला आहे, असे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख (PCMC) म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.