Vadgaon : ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठांचा सन्मान

एमपीसी न्यूज – ज्येष्ठांचे मार्गदर्शन कायम (Vadgaon) बहुमूल्य असते. त्यांच्या अनुभवाच्या शिदोरीवर पुढील पिढी मार्गाक्रमण करीत असते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त वडगाव येथे माजी उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त रविवार(दि1) वडगांव शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा माजी उपनगराध्यक्षा सायली रुपेश म्हाळसकर यांच्या वतीने मावळगड कार्यालय येथे सन्मान करण्यात आला.

यावेळी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुरेश कुडे,उपाध्यक्ष नितीन भांबळ, मारुती चव्हाण,विवेक गुरव,मनोहर बागेवाडी,प्रकाश ढोरे,ज्ञानेश्वर सोनवणे,चंद्रकांत(Vadgaon) ठोंबरे,नथुराम जाधव,पंडित ढोरे,बाळकृष्ण ढोरे, लक्ष्मण ढोरे,दत्तात्रय घोलप,चंद्रकांत राऊत,शांताराम कुडे उपस्थित होते.
यावेळी सर्व ज्येष्ठ नागरिकांचे औक्षण करून त्यांच्या हस्ते केक कापण्यात आला तसेच शाल,श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व प्रश्नांवर चर्चा करण्यात आली .
ज्येष्ठ नागरिकांचे मार्गदर्शन व अनुभव हे नेहमी गावच्या व भावी पिढीच्या भवितव्यासाठी दिशादर्शक ठरत असतात. याच त्यांच्या अनुभवाच्या शिदोरीवर वडगाव शहर हे भविष्यात प्रगतीकडे वाटचाल करेल यात तीळ मात्र शंका (Vadgaon) नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.