Shirgaon : पूर्ववैमनस्यातून तरुणाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – वॉशिंग सेंटरवर काम करणाऱ्या तरुणाला जुन्या(Shirgaon)भांडणाच्या कारणावरून चार जणांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 1) दुपारी एक वाजता दारूम्ब्रे येथील अथर्व वॉशिंग सेंटरवर घडली.

 

ओंकार राक्षे असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी (Shirgaon)किरण राजू सोनटक्के (वय 28, रा. सांगवडे, ता. मावळ) यांनी याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार बाळासाहेब कुंडलिक आगळे (वय 42), आर्यन संजय आगळे (वय 18), आयुष बाळासाहेब आगळे (वय 18), संजय आगळे (वय 42, सर्व रा. दारूम्ब्रे, ता. मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chinchwad : जीवे मारण्याची धमकी देत व्यावसायिकाकडे मागितली खंडणी

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार राक्षे हे फिर्यादी (Shirgaon) यांच्या वॉशिंग सेंटरवर काम करतात. ओंकार आणि आरोपी आयुष आगळे यांचे जुने वाद आहेत.

रविवारी ओंकार हे वॉशिंग सेंटरवर काम करत असताना आरोपी तिथे आले. त्यांनी ओंकार यांना ब्रेक वायर, लोखंडी पाईप आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात ओंकार हे गंभीर जखमी झाले. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.