PCMC :  ”हॉटेल वेस्ट टू बायोगॅस” प्रकल्प कार्यान्वित, प्रतिदिन 50 टन ओल्या कचऱ्यावर होणार प्रक्रिया

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात गोळा होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त (PCMC) पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. हॉटेल्स, रेस्टॉरंट किंवा विविध भागातून मोठ्या प्रमाणात फुड वेस्ट किंवा ओला कचरा निर्माण होत असुन त्यावर प्रक्रिया करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे स्वतंत्र अशी व्यवस्था नव्हती. या समस्येवर उपाय म्हणून महापालिकेच्या वतीने मोशी येथे स्वच्छ भारत योजनेतून बायोगॅस प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला आहे.

Chinchwad: पार्ट टाईम जॉब चे आमिष दाखवून महिलेची साडेपाच लाखांची फसवणूक

‘’हॉटेल वेस्ट टू बायोगॅस’’ अर्थात बायोगॅस प्रक्रिया प्रकल्पाद्वारे हॉटेल मधून गोळा होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून बायोगॅसची निर्मिती करण्यात येणार आहे. बायोगॅसची निर्मिती झाल्यानंतर या बायोगॅसपासून सीएनजीची निर्मिती करून हा सीएनजी कचरा वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांसाठी इंधन म्हणून वापरण्यात येणार आहे. यामुळे महापालिकेच्या इंधन खर्चामध्येही बचत होणार आहे.

प्रकल्पाची क्षमता 200 टन प्रतिदिन वाढविण्याचे नियोजन

सद्यस्थितीत महापालिका कार्यक्षेत्रात 35 ते 38 टन हॉटेल वेस्ट निर्माण होत आहे. या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी 50 टन प्रतिदिन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. पुढील 30 वर्षांचा विचार करून भविष्यात या प्रकल्पाची क्षमता 200 टन प्रतिदिन इतकी वाढविण्याची तरतुद करण्यात आली आहे. यामुळे परिसरातील दुर्गंधी कमी होण्यास मदत मिळणार असून हॉटेल वेस्ट तसेच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. या प्रकल्पाद्वारे महापालिकेने शहर शुन्य कचरा होण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

 
कचरा वाहतुकीची वाहने प्रकल्पातून तयार होणाऱ्या इंधनावर चालणार

पर्यावरणाचे संतुलन टिकवून ठेवण्यासाठी बायोगॅस हा योग्य पर्याय आहे. बायोगॅस प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर कचरा वाहतुकीची सर्व वाहने याच प्रकल्पातून तयार होणाऱ्या इंधनावर चालविण्याचे नियोजन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच या प्रकल्पातून तयार होणारा सीएनजी खुल्या बाजारात विक्रीसाठीही उपलब्ध होणार आहे.
संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

प्रकल्पाची उद्दिष्ट्ये

*  महापालिका हद्दीतील सर्व हॉटेल,रेस्टॉरंट, खाणावळी, मंगल कार्यालय, कॅन्टीन इ. मधुन गोळा होणारा ओला कचरा विशेष जीपीएस सुविधा असणाऱ्या बंदिस्त गाडीतुन गोळा करुन त्याचे विलगीकरण करणे तसेच त्यावर प्रक्रिया करणे.

* सद्यस्थितित प्रकल्पाची क्षमता 50 टन प्रतिदिन इतकी असुन भविष्यात 15 वर्षात वाढणाऱ्या ओल्या कचऱ्याचा विचार करुन प्रकल्पाची क्षमता टप्प्या टप्प्याने 200 टन प्रतिदिन पर्यंत वाढविणे.

* प्रकल्पात तयार होणाऱ्या बायोगॅसपासून सीएनजी बनविणे तसेच हा सीएनजी कचरा वाहतुकीच्या(  PCMC) वाहनांसाठी उपलब्ध करुन देणे व उर्वरित गॅस खुल्या बाजारात विकणे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.