PCMC News: पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी 5 हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार

एमपीसी न्यूज : स्मार्ट सिटी आणि शहराच्या रस्त्यांचा विचार करता पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी 5 हजार सीसीटीव्ही कॅमेरे शहरात विविध ठिकाणी बसविण्याचा महापालिकेचा मानस आहेत. त्यासाठी दोन कंट्रोल रूम देखील निर्माण करण्यात येणार आहेत.(PCMC News) महापालिकेच्या यंत्रणेसाठी आणि पोलीस यंत्रणेसाठी स्वतंत्र कंट्रोल रूम तयार करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी सांगितले.

अतिरिक्त आयुक्त वाघ म्हणाले, वाढत्या नागरीकरणामुळे शहरात अनेक समस्या आणि आव्हाने देखील निर्माण झाले आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात दळणवळण, रहदारीचे वाढते प्रमाण विचारात घेणे आवश्यक आहे. पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या अंदाजे 27 लाख एवढी आहे. 2041 मध्ये लोकसंख्येपेक्षा शहरात वाहनांची संख्या अधिक होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने पार्किंगचा विचार केला तर भयावह चित्र निर्माण होणार आहे.(PCMC News) त्यामुळे या प्रश्नाचा गंभीरतेने विचार करणे गरजेचे आहे. शहरातील दळणवळण व्यवस्था सुरळीत असावी यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. तसेच नागरी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी महापालिका विविध प्रयत्न करत आहे.

Nigdi Police: एटीएम मध्ये चोरीचा प्रयत्न करणाऱ्या तीघांना निगडी पोलिसांकडून अटक

महापालिकेच्या वतीने विकास आराखडा तयार करताना देखील पार्किंगसाठी जागा आरक्षित ठेवली जात आहे.  आयसीसीसीच्या माध्यमातून यावर नियंत्रण आणि देखरेख ठेवण्यात येत आहे.(PCMC News) माहितीचा वापर दळणवळण यंत्रणा योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी आणि त्याद्वारे नागरी जनजीवन सुरळीत करण्याचा मानस आहे.  शहरातील पार्किंगच्या समस्यांसंदर्भात एकत्रितपणे विचार करून शहरातील सर्वयंत्रणांनी समन्वयाने काम करून मार्ग शोधल्यास निरंतर विकासाच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचलले जाईल, असा विश्वास देखील अतिरिक्त आयुक्त  वाघ यांनी व्यक्त केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.