PCMC News : शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त  इतर गोष्टीचे ज्ञान असावे – आयुक्त शेखर सिंह

एमपीसी न्यूज – शालेय विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्यातील सर्जनशील विचार आणि कल्पनांना चालना मिळावी यासाठी (PCMC News)  ‘जल्लोष शिक्षणाचा 2022-23’ हा उपक्रम एक उत्तम व्यासपीठ आहे. या उपक्रमामध्ये शहरातील जास्तीत जास्त शाळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे. शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त  इतर गोष्टी देखील माहित असल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जल्लोष शिक्षणाचा 2022-23 हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमाचे उद्घाटन आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते आज पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात संपन्न झाले.  हा उपक्रम स्पर्धात्मक असून या उपक्रमामध्ये शहरातील सर्व शाळांना सहभागी करण्यात येणार आहे. तसेच केंद्र शासनाच्या वतीने अर्बन आउटकम्स फ्रेमवर्क या उपक्रमांतर्गत ‘चला आपले शहर जाणून घेऊया’ याबाबत शहरात सर्वेक्षण सुरु आहे. या सर्वेक्षणात शाळांचा परिणामी विद्यार्थी आणि पालकांचा सहभाग वाढावा या अनुषंगाने शहरातील महापालिका आणि खाजगी शाळांच्या मुख्याध्यापकांशी संवाद साधताना ते बोलत होते.

Chikhali News : घरात घुसून चोरी करणाऱ्या महिलेस अटक, 1.17 लाख रुपये किंमतीची रोख रक्कम जप्त

या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, शिक्षण विभागाचे उपआयुक्त संदीप खोत, प्रशासन अधिकारी संजय नाईकडे, सहायक प्रशासन अधिकारी रजिया खान, पर्यवेक्षक सुनील लांघी यांच्यासह शहरातील सुमारे 500 हून अधिक महापालिका आणि खाजगी शाळांचे मुख्याध्यापक तसेच शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘जल्लोष शिक्षणाचा 2022-23’ हा उपक्रम नाविन्यपूर्ण गोष्टींना अनुसरून असणार आहे.(PCMC News) शहरातील महापालिका शाळा आणि खाजगी शाळांना एकच व्यासपीठ उपलब्ध व्हावे असा महापालिकेचा मानस आहे. शाळांच्या सर्जनशील कल्पनांना मुलांच्या कलागुणांना उत्तम व्यासपीठ मिळावे यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

हा उपक्रम स्पर्धात्मक असून या स्पर्धेतील विजेत्या शाळा आणि विद्यार्थ्यांना महापालिकेच्या वतीने बक्षिस देण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये शहरातील जास्तीत जास्त शाळांचा सहभाग अपेक्षित आहे. मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून या मध्ये सहभागी करावे, असे आयुक्त सिंह यांनी यावेळी उपस्थित मुख्याध्यापकांना सांगितले.

तसेच शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त  इतर गोष्टी देखील माहित असल्या पाहिजे. मुलांना आपल्या शहराबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. महापालिकेच्या वतीने शहरामध्ये कोणते उपक्रम राबविले जात आहेत. याबद्दल विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांचे आपल्या शहराबाबत काय मत आहे, (PCMC News) हे जाणून घेण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने अर्बन आउटकम्स फ्रेमवर्क या उपक्रमांतर्गत ‘चला आपले शहर जाणून घेऊया’ याबाबत शहरात सर्वेक्षण सुरु आहे. या उपक्रमांत जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन आपल्या शहराबद्दलचे मत नोंदवून पिंपरी-चिंचवड शहराला देशात प्रथम क्रमांकाने विजयी करायचे आहे.

यामध्ये नागरिकांकडून आलेल्या नाविन्यपूर्ण कल्पनांना महापालिकेच्या ध्येय धोरणांमध्ये समाविष्ट करण्याचा महापालिकेचा मानस आहे. विद्यार्थ्यांमार्फत पालकांपर्यंत हा संदेश पोहोचवल्यास हे सर्वेक्षण व्यापक प्रमाणात होण्यास मदत होणार आहे. यासाठी सर्वांचा सहभाग आणि सहकार्य अपेक्षित आहे, असे आयुक्त शेखर सिंह म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.