PCMC : महापालिका किवळेत उद्यान विकसित करणार

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदार संघातील (PCMC)प्रभाग क्रमांक 24 किवळे येथील उद्यानाकरिता आरक्षित असलेल्या महापालिकेच्या ताब्यातील जागेत राष्ट्रीय उद्यान विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठीच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.

स्थायी समितीची बैठक संपन्न झाली, बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह होते. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.

Pune : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एका समाजाचे नसून बहुजन समाजाचे पुढारी : अरविंद शिंदे

सन 2023-24 करिता काळेवाडी, पवनानगर, (PCMC)विजयनगर, किवळे मामुर्डी, रावेत येथील सेक्टर नं. 29, सिटी प्राईड शाळेलगतचा परिसर, म्हस्के वस्ती, शिंदे वस्ती, काळेवाडी, नढेनगर, कोकणेनगर व इतर परिसरात मुख्य जलनि:सारण नलिका टाकणे, प्रभाग क्र. 2 मधील अतिक्रमण व अनाधिकृत बांधकामांवर कार्यवाहीसाठी लागणारी यंत्रसामृगी व मनुष्यबळ पुरविणे, नवीन जिजामाता रुग्णालय पिंपरी येथील अग्निप्रतिबंधक यंत्रणेची वार्षिक पद्धतीने देखभाल दुरूस्ती करणे, चिखली सेक्टर क्रमांक 17 व 19 येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या (ई.डब्ल्यु.एस) गृहप्रकल्पामध्ये बहुउद्देशीय इमारत बांधणेकामी येणाऱ्या खर्चास प्रभाग क्रमांक 25 पुनावळे येथील गायकवाड नगर मधील 18 मीटर रुंद डी.पी रस्त्यांची उर्वरित स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाचे प्रभाग क्र. 8 मध्ये जलतरण तलाव विकसित करणे, बोऱ्हाडेवाडी व बनकरवस्ती परिसरात पावसाचे पाण्यासाठी आरसीसी पाईप लाईन टाकणे, स्थापत्य विषयक कामे करणे, प्रभाग क्रमांक 14 मध्ये फुटपाथ, स्ट्रॉर्म वॉटर व इतर स्थापत्य विषयक दुरूस्तीची कामे करणे, अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण, जल्लोष शिक्षणाचा 2023 मधील विजेत्या शाळांना क्रीडा साहित्याची खरेदी करून पुरवठा करणे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या क्ष किरण विभागातील डिजीटल रेडिओग्राफी सिस्टमसाठी जनरेटर खरेदी करणे, मोशी डुडुळगाव व इतर परिसरातील स्थापत्य विषयक कामे करणे, प्रभाग क्रमांक 19 मध्ये रोड फर्निचर व इतर अनुषंगिक कामे करणे तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील पार्किंग पॉलिसीनुसार स्थापत्य विषयक सुधारणांची कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.