Maval : ज्ञानाची ज्योत पेटवणाऱ्या डॉ आंबेडकरांचे विचार प्रेरणादायी : डॉ. मिसाळ

एमपीसी न्यूज – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर (Maval )यांच्या जीवनातून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. वंचित समाजासाठी त्यांनी केलेले कार्य अतुलनीय असे आहे.

त्यांच्यामुळे गोरगरीब आणि दलित समाज शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आला स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार करून अनेकांच्या जीवनात ज्ञानाची ज्योत तेववणाऱ्या डॉ आंबेडकर यांचे विचार कायमच प्रेरणा देत राहतील.” असे विचार प्राचार्य डॉ श्रीहरी मिसाळ यांनी व्यक्त केले.

Alandi : कार्तिकी यात्रे निमित्त इंद्रायणी घाटावरती सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांनी रेखाटली चित्रे

मावळ शिक्षण प्रतिष्ठान संचलित, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात (Maval )डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डॉ आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ. मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस अभिवादन केले.यावेळी प्रा. शिल्पा वाजे, प्रा. माधुरी चंदनशिव, प्रा. माधवी शेटे, प्रा. स्वाती पाटील, प्रा. मनिषा लगड, प्रा. श्रुतिका झोडगे, प्रा. चंदन सोनाळे, डॉ प्रतीक ससाणे, प्रा सोमनाथ कसबे, रोहिणी टाकसाळे आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्रा. डॉ. विनया केसकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. हेमंत मुजळगेकर यांनी आभार मानले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.