Alandi : कार्तिकी यात्रे निमित्त इंद्रायणी घाटावरती सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांनी रेखाटली चित्रे

एमपीसी न्यूज -संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी (Alandi )सोहळा व कार्तिकी यात्रे निमित्ताने फुलगाव येथील नेताजीसुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांनी आज दि.6 रोजी इंद्रायणी घाटा वरती संत ज्ञानेश्वर महाराज निवडक जीवन चरित्र चित्र व कार्तिकी यात्रा वारी निवडक आकर्षक अशी चित्रे कागदावर रेखाटली.

संत ज्ञानेश्वर, मुक्ताई,श्री विठ्ठल,लहान मोठे वारकरी ,संत तुकाराम महाराज (Alandi )श्री विठ्ठल अशी विविध प्रकारची सुंदर चित्रे यावेळी विद्यार्थ्यांनी रेखाटून त्यामध्ये योग्य असे रंग भरले.अनेक वारकरी भाविकांनी आपल्या कॅमेऱ्यात ती सुंदर चित्रे कैद केली.

Pune : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष सर्वांसाठीच आदर्श : दीपक मानकर

ही चित्रे पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.
चित्रकला प्रशिक्षक शंकर साळुंके,शिक्षक अनिल कवटे व इतर शिक्षक कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.