Pune : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष सर्वांसाठीच आदर्श : दीपक मानकर

एमपीसी न्यूज – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लोककल्याणकारी (Pune)विचार देशवासियांसाठी असून त्यांनी देशाला दिलेले संविधान आणि त्यांचा संघर्ष सर्वांसाठीच आदर्श आहे, असे पुणे शहर राष्ट्रवादी (अजित पवार गट) अध्यक्ष दीपक मानकर म्हणाले.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वे स्टेशन परिसरातील भारतरत्न, वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेची (Pune)निर्मिती करून देशातील सर्व नागरिकांना समान दर्जा मिळवून दिला. वंचितांच्या हक्कांसाठी त्यांनी खंबीरपणे दिलेला लढा कायमच प्रेरणा देणारा आहे.

Pune : पुणे पुस्तक महोत्सवा निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाहिली आदरांजली

देशाच्या राज्यघटनेच्या निर्मितीत देशाच्या सिंहाचा वाटा उचलणारे राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी-कोटी प्रणाम असल्याचेही मानकर यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.