Vadgaon : भर दिवसा महिलेचा विनयभंग अन कुऱ्हाडीने वार

एमपीसी न्यूज – महिलेला फोन करून तिच्याशी लगट करण्याचा(Vadgaon) प्रयत्न करत विनयभंग केला. महिलेने प्रतिकार केला असता तिच्यावर कुऱ्हाडीने वार करत गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. 4) सायंकाळी पावणे पाच वाजता मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक येथे घडली.

याप्रकरणी 35 वर्षीय जखमी महिलेने वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अंकित साकेत याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकित (Vadgaon)साकेत याने फिर्यादी महिलेशी गैरवर्तन करत तिचा पाठलाग केला. तिच्याशी लगट करत तिचा विनयभंग केला. फिर्यादीने अंकित याला नकार दिला. त्यानंतर फिर्यादी महिला रस्त्याने जात असताना अंकित दुचाकीवरून आला.

Iti : कासारवाडी येथील मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य पदी ज्योत सोनवणे

त्याने महिलेच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केला. यामध्ये महिलेच्या उजव्या कानाची पाळी तुटून गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी खुनाचा प्रयत्न आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक संतोष जाधव तपास करीत आहेत.

 

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.