PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त स्पर्धांचा बक्षीस वितरण व उत्कृष्ट कर्मचारी सन्मान सोहळा संपन्न

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC ) 41 व्या वर्धापनदिनानिमित कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासाठी विविध क्रीडास्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचे बक्षीस वितरण आणि सन 2022 मध्ये उत्कृष्ट कर्मचारी म्हणून सेवा बजावणाऱ्या कर्मचा-यांचा सन्मान सोहळा चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता . यावेळी आयुक्त शेखर सिंह यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमादरम्यान 2022 या वर्षात उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आयुक्तांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यामध्ये डॉ. अभिजीत सांगडे, सुनिल दांगडे, अनिता केदारी, मेघा सुर्वे, संदिप वडके, मुकेश कोळप, विजयसिंह भोसले, तन्मय भोसले, विशाल भालेराव, निखील फेंडर, काळुराम कुदळे, रोहिदास गेंगजे, विशाल गायकवाड, मंगेश डोळस, प्रतिक भसारकर, सुमन वंजारे, संजय निकम, अमोल चिपळुणकर, जालिंदर साखरे, संगिता वाळुंजकर, रविंद्र कांबळे, गणेश पौनिकर, सोमनाथ कुदळे, प्रकाश घोडके, किशोर निकाळजे, शिधाजी जाधव, सुनिल बेळगावकर, अंबादास फटांगरे, वनिता बहुले, भागवत दरेकर, वर्षा जानराव, संतोष कदम, राजू काळभोर, नंदिनी कदम, विक्रम कोकणे, युवराज बराटे, मिलिंद पेटकर, शिवकुमार ग्वालवंशी, नवनाथ देवकाते, पुजा लाखे, विवेक मालशे, मिठू बोरूडे, दिपक पवार, सागर बाणेकर, प्रशांत जोशी, दिनेश कुदळे, प्रसाद वाबळे, गोविंद डाके, महेंद्र गायकवाड, हेमा शिंदे, प्रकाश जाधव, प्रिती देवकर या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने विविध कार्यक्रम तसेच स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेच्या (PCMC) अधिकारी आणि कर्मचारी यांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन मनसोक्त आनंद घेतला.

क्रीडा स्पर्धांमध्ये बुद्धिबळ स्पर्धा, बॅडमिंटन स्पर्धा, रायफल शुटींग (नेमबाजी), क्रिकेट, कॅरम, रस्सीखेच, संगीत खुर्ची या स्पर्धांचा समावेश होता. तर मैदानी स्पर्धांमध्ये थाळीफेक, गोळाफेक, 50 मीटर, 100 मीटर, 200 मीटर धावणे आणि लांबउडी या स्पर्धांचा समावेश होता.

क्रिकेट खेळामध्ये महापालिका पुरूष कर्मचारी महासंघाने तर महिला कर्मचारी महासंघाने प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल आयुक्तांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. रायफल शुटींगमध्ये प्रथम दत्ता सुर्यवंशी, द्वितीय मंगेश देशमुख, तृतीय संदीप विनोद तर महिलांमध्ये क्रमांक प्रथम रुपाली निकम, द्वितीय अस्मिता गुरव, तृतीय माधुरी चव्हाण यांनी पटकाविला.

बॅडमिंटनमध्ये 40 वर्षांखालील महिला एकेरी स्पर्धेत प्रथम क्रमांक मनिषा खेडकर, द्वितीय क्रमांक स्वाती निमगुळकर, तृतीय क्रमांक स्वप्नाली काळभोर तर 40 वर्षांवरील महिला एकेरी स्पर्धेत प्रथम क्रमांक सुनिता पालवे, द्वितीय क्रमांक ऐश्वर्या साठे, तृतीय क्रमांक रोजमेरी जेकब यांनी पटकाविला.

40 वर्षांवरील महिला दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सुनिता पालवे आणि ऐश्वर्या साठे, तृतीय क्रमांक कांचन कोपरडे (PCMC) आणि रोजमेरी जेकब, तृतीय क्रमांक मंगल जाधव आणि सुषमा तुरूकमारे तसेच 40 वर्षांखालील महिला दुहेरी बॅडमिंटन स्पर्धेत प्रथम क्रमांक मनिषा खेडकर आणि शितल फुले, द्वितीय क्रमांक स्वप्नाली काळभोर आणि स्वाती निमगुळकर, तृतीय क्रमांक मीना पालकर आणि निकीता पठारे यांनी पटकाविला.

40 वर्षांवरील पुरूष बॅडमिंटन स्पर्धेत प्रथम क्रमांक विजयसिंह भोसले, द्वितीय क्रमांक हनुमंत टिळेकर, तृतीय क्रमांक प्रशांत जगताप तसेच 40 वर्षांवरील पुरूष दुहेरी स्पर्धेत प्रथम क्रमांक विजयसिंह भोसले आणि हरविंदरसिंग बंसल, द्वितीय क्रमांक हनुमंत टिळेकर आणि प्रशांत जगताप, तृतीय क्रमांक राजकुमार तिकोणे आणि अरूण वाबळे यांनी पटकाविला.

40वर्षांखालील पुरूष बॅडमिंटन एकेरी स्पर्धेत प्रथम क्रमांक विशाल होले, द्वितीय क्रमांक अमोल शेलार, तृतीय क्रमांक विजय सोलंकी यांनी पटकाविला. तसेच 40वर्षांखालील पुरूष बॅडमिंटन दुहेरी स्पर्धेत प्रथम क्रमांक विशाल होले आणि अमोल जाधव, द्वितीय क्रमांक अमोल शेलार आणि ओंकार कहाणे, तृतीय क्रमांक अभिजीत दाढे आणि विजय लाडे यांनी पटकाविला.

पुरूष रस्सीखेचमध्ये प्रथम क्रमांक आयुक्त व अधिकारी संघ, द्वितीय क्रमांक कर्मचारी महासंघाने तर महिला रस्सीखेचमध्ये प्रथम क्रमांक महिला कर्मचारी महासंघ, द्वितीय क्रमांक महिला अधिकारी संघाने पटकाविला. बुद्धीबळमध्ये पुरूषांमध्ये प्रथम क्रमांक शहाजी जमादार, द्वितीय क्रमांक अविनाश चव्हाण, तृतीय क्रमांक अक्षय कातुरे तर महिलांमध्ये प्रथम क्रमांक सोनल लोणे, द्वितीय क्रमांक सिमा बुराडे, तृतीय क्रमांक प्रज्ञा सोरदे यांनी पटकाविला.

50 मीटर धावणे 40 वर्षांवरील पुरूष गटात प्रथम क्रमांक सुनिल जाधव, द्वितीय क्रमांक घनशाम कदम, तृतीय क्रमांक रविंद्र तनपुरे तर 100 मीटर धावणे 40 वर्षाखालील पुरूष गटात प्रथम क्रमांक आवेज पठाण, द्वितीय क्रमांक शंकर आहेर, तृतीय क्रमांक कांचन कुमार यांनी पटकाविला.

गोळा फेक 40 वर्षावरील पुरूष गटात प्रथम क्रमांक सोपान खोसे, द्वितीय क्रमांक रविंद्र तनपुरे, तृतीय क्रमांक पांडुरंग घुगे तर 40 वर्षाखालील पुरूषांमध्ये प्रथम क्रमांक अमोल सोनवणे, द्वितीय क्रमांक आवेज पठाण, तृतीय क्रमांक प्रशांत बनकर यांनी पटकाविला.

थाळीफेकमध्ये 40 वर्षावरील पुरूषांमध्ये प्रथम क्रमांक लक्ष्मण माने, द्वितीय क्रमांक प्रफुल्ल मसूरकर, तृतीय क्रमांक दिपक जगताप तर 40 वर्षाखालील पुरूषांमध्ये प्रथम क्रमांक प्रथम क्रमांक मुकेश बर्वे, द्वितीय क्रमांक मयुर कुंभार, तृतीय क्रमांक वैभव धाणेकर यांनी पटकाविला.

लांब उडीमध्ये 40 वर्षावरील पुरूषांमध्ये प्रथम क्रमांक रविंद्र तनपुरे, द्वितीय क्रमांक घनशाम कदम, तृतीय क्रमांक विशाल कांबळे तर 40 वर्षाखालील पुरूषांमध्ये प्रथम क्रमांक प्रशांत बनकर, द्वितीय क्रमांक सुखदेव वीर, तृतीय क्रमांक विकास तांदळे यांनी पटकाविला.

50 मीटर धावणे 40 वर्षावरील महिला गटात प्रथम क्रमांक रुपाली निकम, द्वितीय क्रमांक गीता धंगेकर, तृतीय क्रमांक ऐश्वर्या साठे तर 40 वर्षाखालील महिला गटात प्रथम क्रमांक अनुष्का अधिकारी, द्वितीय क्रमांक प्रियांका गिरमे, तृतीय क्रमांक पूनम घाटगे यांनी पटकाविला.

100 मीटर धावणे 40 वर्षावरील महिला गटात प्रथम क्रमांक माधुरी चव्हाण, द्वितीय क्रमांक सुषमा तुरूकमारे, तृतीय क्रमांक गीता धंगेकर तर 40 वर्षाखालील महिला गटात प्रथम क्रमांक अनुष्का अधिकारी, द्वितीय क्रमांक रुपाली उभे, तृतीय क्रमांक पुनम घाटगे यांनी पटकाविला.

गोळाफेकमध्ये 40 वर्षावरील महिला गटात प्रथम क्रमांक वंदन आहेर, द्वितीय क्रमांक सुनिता पालवे, तृतीय क्रमांक चारुशिला जाधव तर 40 वर्षाखालील महिला गटात प्रथम सोनाली बेलवटे, द्वितीय संगीता कराड, तृतीय आश्विनी घुगे यांनी पटकाविला. थाळीफेकमध्ये 40 वर्षावरील महिला गटात प्रथम क्रमांक वंदना आहेर, द्वितीय क्रमांक आस्मिता गुरव, तृतीय क्रमांक मंगल जाधव तर 40 वर्षाखालील महिला गटात प्रथम क्रमांक सोनाली सोनाली बेलवटे, द्वितीय क्रमांक आश्विनी घुगे, तृतीय क्रमांक संगीता कराड यांनी पटकाविला.

लांबउडीमध्ये 40 वर्षावरील महिला गटात प्रथम क्रमांक सुनिता पालवे, द्वितीय क्रमांक संपदा चासकर, तृतीय क्रमांक मनिषा खेडकर तर 40 वर्षाखालील महिला प्रथम क्रमांक रुपाली उभे, द्वितीय क्रमांक सुप्रिया सुरगुडे, तृतीय क्रमांक वैशाली भागवत यांनी पटकाविला.

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य इमारतीमध्ये महिलांसाठी खास पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये गोड पदार्थ श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक गीता धंगेकर, द्वितीय क्रमांक सुवर्णा शिंदे, तृतीय क्रमांक प्राजक्ता झेंडे तर तिखट पदार्थ श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक स्वाती निमगुळकर, द्वितीय क्रमांक सुनिता तिकोणे, तृतीय क्रमांक दिपाली कर्णे यांनी पटकाविला.

रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक समीर पटेल, द्वितीय क्रमांक सुप्रिया नांदकर, तृतीय क्रमांक शितल तारू यांनी पटकाविला तर फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मनिषा खेडकर, द्वितीय क्रमांक शोभा ढोले, तृतीय क्रमांक माधुरी चव्हाण यांनी पटकाविला.

Pune : टेबल टेनिस स्पर्धेत पुण्याच्या पृथा वर्टीकरला दुहेरी मुकुट; मुलांमध्ये नाशिकचा कुशल चोपडा विजेता

8 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजता जे.एस.पी.एम कॉलेज कंपाऊंड शेजारी ताथवडे येथे मोकळ्या जागेत एलपीजी बुलेट मधून गॅस सिलेंडरमध्ये अनाधिकृतपणे गॅस भरताना स्फोट होऊन लागलेल्या आगीवर पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाने तातडीने नियंत्रण मिळविले आणि संभाव्य धोका टळला.

अग्निशमन दलाच्या या कामगिरीमुळे आयुक्त सिंह यांच्या हस्ते अग्निशमन विभागातील अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे, उप अग्निशमन अधिकारी अनिल डिंबळे, प्रमुख अग्निशमन विमोचक विठ्ठल घुसे, सोमनाथ तुकदेव, मुकेश बर्वे, ज्येष्ठ अग्निशमन विमोचक पुंडलिक भूतापल्ले, अग्निशमन विमोचक नामदेव वाघे, शिवलाल झंकार, वाहनचालक श्रावण चिमटे, लक्ष्मण बंडगर, सुरेश कुमार, राजेश हिंगणे, मयूर कुंभार या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

या कार्यक्रमावेळी माझी वसुंधरा अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला. त्यामध्ये उद्यान निरिक्षक दत्तात्रय आढळे, सहाय्यक उद्यान अधिक्षक राजेश वसावे, मंजुषा हिंगे, ज्ञानोबा कांबळे, उद्यान सहाय्यक भाऊसाहेब सगरे, नंदकुमार ढवळसकर, सुरेश घोडे, संतोष रायकर, अजयकुमार जाधव, सिद्धेश्वर कडाळे, किरण शिरसाठ, शिवाजी बुचडे, अनिल गायकवाड, प्रदीप गजरमल, हनुमंत चाकणकर, सुहास सामसे, असिस्टंट हॉर्टी सुपरवायझर चंद्रकांत गावडे, भानुदास तापकीर, सुनील दुदुसकर, सहाय्यक उद्यान निरिक्षक गोपाळ खैरे या कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.