Pimpri : तरुणीला लग्नाची मागणी घालून विनयभंग करणाऱ्या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज : तरुणीचा पाठलाग करत (Pimpri) तिच्याकडे लग्नाची मागणी घातली. तिने नकार दिला असता धमकी देत तिचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. संबधित तरुण हा पीडितेला एप्रिल 2023 पासून त्रास देत होता.

पीडितेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी यावरून कृष्णा हनुंमत पुजारी (वय 27, रा. काळेवाडी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त स्पर्धांचा बक्षीस वितरण व उत्कृष्ट कर्मचारी सन्मान सोहळा संपन्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या एका हॉस्पिटलमध्ये काम करतात. त्या कामाला पायी जात असताना आरोपीने (Pimpri) फिर्यादीचा पाठलाग करून त्यांना आडवले व लग्नाची मागणी घातली.

यावेळी फिर्यादी यांनी नकार दिला. या रागातून फिर्यादी यांचा आरोपीने विनयभंग केला. तसेच 10 ऑक्टोबर रोजी फिर्यादी यांच्या रुग्णवाहिकेवर दगड मारून धमकी दिली. यावरून पिंपरी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.