Dighi : धुळे येथे खून करून पळालेल्या सराईत आरोपींना दिघीतून अटक

एमपीसी न्यूज – धुळे येथील आझाद नगर पोलीस ठाण्याच्या (Dighi) हद्दीत खून करून पळालेल्या तीन सराईत गुन्हेगारांना दिघी येथील मॅक्झिन चौकातून अटक करण्यात आली. हे आरोपी 8 ऑक्टोबर रोजी पसार झाले होते.

महेश उर्फ घनश्याम पवार, गणेश माळी, जगदीश चौधरी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, 8 ऑक्टोबर रोजी आरोपींनी शुभम साळुंखे यांचा व्यावसायिक कारणावरून कोयता, फायटर आणि धारदार शस्त्रांनी हल्ला करून खून केला.

Pimpri : तरुणीला लग्नाची मागणी घालून विनयभंग करणाऱ्या तरुणाला अटक

त्यानंतर हे आरोपी पिंपरी चिंचवड शहरात आले. याबाबत धुळे पोलिसांनी पिंपरी चिंचवड पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार (Dighi) आरोपी दिघी परिसरातील मॅगझिन चौकात आले असल्याची माहिती दिघी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तिघांना शिताफीने ताब्यात घेतले. आरोपींना पुढील कारवाईसाठी धुळे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.