Pimpri Chinchwad : पालिकेकडून शहरात कमी उत्सर्जन क्षेत्र स्थापन करण्याबाबत कार्यशाळा संपन्न

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिका, ब्रिटीश उपउच्चायुक्तालय (Pimpri Chinchwad) आणि सेनेक्स संस्थेच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी पिंपरी येथील डबल ट्री हॉटेलमध्ये लो इमिशन झोन म्हणजेच कमी उत्सर्जन क्षेत्र या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्दिष्ट शहरात कमी उत्सर्जन क्षेत्र स्थापन करण्याचे महत्व समजावून घेणे आणि युकेमधील कमी उत्सर्जन क्षेत्रांबद्दल माहिती घेणे हे होते.

या कार्यशाळेत आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, उपायुक्त रविकिरण घोडके, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड तसेच डॉ. नयनिका सिंह, ब्रिटिश उच्चायुक्तालयाचे अवनीश मल्होत्रा आणि ब्रिटिश उपउच्चायुक्तालयाचे (ब्रिटिश व्यापार कार्यालय) हिरावती गोखले आणि सेनेक्स युकेमधील वाहतूक प्रमुख स्टीव्ह कॅरोल उपस्थित होते.

यावेळी आयुक्त सिंह यांनी हरित सेतू आणि इलेक्ट्रिक व्हेईकल रेडिनेस प्लॅन सारख्या उपक्रमांचा उल्लेख करत शाश्वत
गतिशीलतेसाठी महापालिकेने राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली आणि पिंपरी-चिंचवड सारख्या झपाट्याने वाढणाऱ्या शहरात कमी उत्सर्जन क्षेत्रांची अंमलबजावणी करण्यासाठी येणारी आव्हाने तसेच तंत्रज्ञान आणि नागरिकांच्या सहभाग वाढविण्यावर भर कसा देता येईल यावर मार्गदर्शन केले.

Dighi : धुळे येथे खून करून पळालेल्या सराईत आरोपींना दिघीतून अटक

शहरातील प्रदूषण पातळी कमी करण्याच्या गंभीर समस्येचे निराकरण करण्यासाठी सरकारी संस्था, व्यवसायिक संस्था, (Pimpri Chinchwad) स्वयंसेवी संस्था तसेच विविध भागधारकांच्या मदतीसह करण्यात आलेल्या आणि भविष्यात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहितीही आयुक्त सिंह यांनी दिली.

सेनेक्सचे स्टीव्ह कॅरोल यांनी ड्राफ्ट टुलकिट आणि शहर विशिष्ट कृती योजनेचा आढावा घेतला तसेच फायनल टूलकिटसाठी
अभिप्राय गोळा करणे आणि शहर विशिष्ट कृती योजना लागू करण्यासाठी येणारे अडथळे ओळखण्याबाबत मार्गदर्शन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.