Pune : टेबल टेनिस स्पर्धेत पुण्याच्या पृथा वर्टीकरला दुहेरी मुकुट; मुलांमध्ये नाशिकचा कुशल चोपडा विजेता

एमपीसी न्यूज – पुण्याची पृथा वर्टीकर हिने अनपेक्षित (Pune ) विजयाची मालिका कायम ठेवताना महिला गटापाटोपाठ मुलींच्या 19 वर्षाखालील गटातही अजिंक्यपद मिळविले आणि चौथ्या राज्य मानांकन  टेबल टेनिस स्पर्धेत दुहेरी मुकुट मिळविला. मुलांच्या 19 वर्षाखालील गटात कुशल चोपडा या नाशिकच्या खेळाडूने विजेतेपद पटकाविले.

राज्य टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ यांनी सीकेपी हॉलमध्ये या स्पर्धेचे आयोजन केले आहे. अकराव्या मानांकित पृथा हिने मुलींच्या अंतिम सामन्यात नवव्या मानांकित काव्या भट्ट हिच्यावर अनपेक्षित विजय मिळविला. तिने हा सामना 10-12,10-12, 11-8, 11-6,12-10, 13-11 असा जिंकताना काउंटर अटॅक पद्धतीचा सुरेख खेळ केला.

Pune : पुणे स्टेशन परिसरात मोबाईल चोरी करणाऱ्या सराईताला अटक, 20 मोबाईल जप्त

पहिल्या दोन गेम गमावल्यानंतर तिने अतिशय संयम ठेवीत विजय खेचून आणला. ठाण्याची खेळाडू काव्या हिने जिंकण्यासाठी (Pune ) शर्थ केली मात्र शेवटपर्यंत पृथा हिने आपले नियंत्रण ठेवले. उपांत्य फेरीत पृथा हिने मुंबईच्या टीएसटी संघाची सातवी मानांकित खेळाडू अनन्या चांदे हिचे आव्हान संपुष्टात आणले होते. अन्य उपांत्य लढतीत काव्याने आर्या सोनगडकर या आपल्या सहकारी खेळाडूला पराभूत केले.

(कुशल चोपडा)

मुलांच्या अंतिम सामन्यात अकरावा मानांकित खेळाडू कुशल याने अग्रमानांकित खेळाडू सागर कस्तुरे याचे आव्हान 11-5,11-8,11-4,18-16 असे मोडीत काढले. त्याने टॉप स्पिन फटक्यांचा बहारदार खेळ केला. या सामन्यात त्याने सुरुवातीपासूनच खेळावर नियंत्रण मिळवले होते. उपांत्य फेरीत त्याने द्वितीय मानांकित जश मोदी याला पराभूत केले होते. तर सागर याने पाचवा मानांकित आदी चिटणीस याला हरविले होते. ‌

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.