PCMC : महापालिकेच्या ठेवींची माहिती देण्यास टाळाटाळ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका 550 कोटींचे कर्ज ( PCMC) काढण्याच्या तयारीत आहे. वारंवार कर्ज काढून मोठे प्रकल्प हाती घेतले जात आहेत. मात्र, महापालिकेच्या ठेवींची नेमकी माहिती माहपालिकेकडून जनतेसमोर मांडली जात नाही. माहिती देण्यास टाळाटाळ करत अधिका-यांकडून लपवाछपवी सुरू आहे.

Talegaon Dabhade : भंडारा डोंगर येथे गाथा पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

महापालिकेवर स्थापत्य, स्थापत्य प्रकल्प, बीआरटी, पाणी पुरवठा, विद्युत, पर्यावरण, जलनिस्सारण, भांडार, आरोग्य या विभागाच्या कामांमुळे सद्यस्थितीत 4 हजार कोटींपर्यंतचे दायित्व वाढल्याची चर्चा आहे. खासगीत अनेक पालिका अधिकारी याविषयी बोलत आहेत. यातून पालिकेच्या आर्थिक स्थितीबाबत शंका उपस्थित होत आहेत.

या सगळ्यात वित्त व लेखा विभागाकडून योग्य माहिती शहराला देणे गरजेचे आहे. तसे असताना या विभागाचे अधिकारी महापालिकेवरील दायित्व आणि ठेवींबाबत माध्यमांना माहिती देण्यास सातत्याने टाळाटाळ करत आहेत. पालिकेच्या चुकीच्या धोरणांमुळे पालिकेचा आर्थिक डोलारा कोसळण्याची भीती व्यक्त होत. आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पावर देखील याचा परिणाम होऊ शकतो. अर्थसंकल्पात कर्जावर आणि ठेवी मोडण्याशिवाय  प्रशासनाकडे पर्याय उरलेला दिसत नाही. त्यामुळे पालिकेकडून ठेवींची माहिती दडवली जात आहे. संबधित अधिकारी व प्रशासनाच्या भूमिकेवर यावरून संशय निर्माण होत ( PCMC)  आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.