Talegaon Dabhade : भंडारा डोंगर येथे गाथा पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

एमपीसी न्यूज – श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज (Talegaon Dabhade) भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीने श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे माघ शुद्ध दशमी निमित्त गाथा पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सप्ताह बुधवार (दि. 14) ते बुधवार (दि. 21) या कालावधीत संपन्न होणार आहे. अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष हभप बाळासाहेब काशीद महाराज यांनी एमपीसी न्यूजशी बोलताना दिली.

या सप्ताह मध्ये सकाळी 7 ते 12 गाथा पारायण, दुपारी 12 ते 2 भोजन, 2 ते 4 गाथा पारायण, सायंकाळी 4 ते 6 प्रवचन, 6 ते 7 हरिपाठ, 7 ते 8 भोजन, रात्री 8 ते 10 किर्तन व रात्री 11 ते पहाटे 4 वाजेपर्यंत सार्वजनिक जागर असे कार्यक्रम होणार आहेत.

यामध्ये रात्री 8 ते 10 या कालावधीत कीर्तन सेवा होईल. बुधवार दि 14 फेब्रुवारी – हभप गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली कदम (मोठे माऊली, आळंदी), गुरुवार दि 15 फेब्रुवारी – हभप भागवताचार्य डॉ. विकासानंद महाराज मिसाळ (नगर), शुक्रवार दि. 16 – हभप गुरुवर्य पांडुरंग महाराज गिरी (नाशिक), शनिवार दि. 17- ह भ प गुरुवर्य जयेश महाराज भाग्यवंत (मुंबई), रविवार दि.18 – हभप गुरुवर्य बंडा महाराज (तात्या) कराडकर (कराड- सातारा), सोमवार माघ शु दशमी दि. 19- हभप गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर (नांदेड), मंगळवार दि.20 – ह भ प वारकरी रत्न ज्ञानेश्वर माऊली कदम (छोटे माऊली), बुधवार दि.21- काल्याचे किर्तन – सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत हभप गुरुवर्य उमेश महाराज दशरथे (मानवतकर)परभणी यांचे होणार आहे.

Central Railway : मध्य रेल्वेच्या 11 कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार

सोमवार (दि 19) रोजी दु. 12 ते 1.30 वा.गणेश आत्माराम शिंदे व सुप्रसिद्ध गायिका सन्मिता गणेश शिंदे (Talegaon Dabhade) यांचा ‘मोगरा फुलला’ हा सुश्राव्य अभंगवाणीचा कार्यक्रम तसेच दु. 2 ते 4:30 या वेळेत सुप्रसिद्ध मेघना झुझम (भिंवर पाटील) यांचा ‘तुझिया नामाचा गजर’ हा भक्तिमय कार्यक्रम होणार आहे. तसेच दि. 14 ते 20 पर्यंत सायं. 4 ते 6 कैवल्यमूर्ती संत श्री ज्ञानेश्वर महाराज तत्त्वचिंतन प्रवक्ते हभप रविदास महाराज शिरसाठ (आळंदी) यांचे होईल.

पारायण व्यासपीठ नेतृत्व हभप गाथामूर्ती नाना महाराज तावरे करतील. पारायणासाठी येणाऱ्या भाविकांसाठी निवास व भोजन व्यवस्था विनामूल्य केली आहे. पारायणासाठी येणाऱ्या भाविकांनी व्यासपीठ व देवडी कृत श्री तुकाराम महाराजाची गाथा आणावी असे आवाहन ट्रस्ट कडून करण्यात आले (Talegaon Dabhade) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.