Central Railway : मध्य रेल्वेच्या 11 कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार

एमपीसी न्यूज – मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करन यादव यांनी ( Central Railway) मध्य रेल्वेच्या 11 कर्मचार्‍यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार’ प्रदान केला. ज्यामध्ये मुंबई विभागातील 2, नागपूर विभागातील 3, भुसावळ विभागातील 3, सोलापूर विभागातील 2 आणि पुणे विभागातील एका कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. नोव्हेंबर-2023 ते जानेवारी-2024 या कालावधीत कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावत असताना घेतलेल्या दक्षता, अनुचित घटना रोखण्यामध्ये आणि सुरक्षेची खात्री करण्यामध्ये दिलेल्या योगदान याबद्दल हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. पदक, प्रमाणपत्र, अनुकरणीय सुरक्षा कार्यासाठी प्रशस्तीपत्र आणि दोन हजार रुपये रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

यावेळी अपर महाव्यवस्थापक चित्तरंजन स्वैन, प्रधान मुख्य सुरक्षा अधिकारी एम एस उप्पल, प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक एस एस गुप्ता, राजेश अरोरा, प्रधान मुख्य अभियंता सुनील कुमार, प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता एन पी सिंग, प्रधान मुख्य विद्युतीय अभियंता अवनीश कुमार पांडेय, मुख्य प्रशासकीय अधिकारी (निर्माण) आणि मध्य रेल्वेचे उप महाव्यवस्थापक सचिव पी के चतुर्वेदी यावेळी उपस्थित होते.

मुंबई विभाग

समीर हांडे, पॉइंट्समन, मस्जिद स्टेशन, मुंबई विभाग
6 जानेवारी 2024 रोजी मस्जिद स्थानकावर ड्युटीवर असताना, प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर दुपारी 12.25 वाजता नियमित गस्त घालत असताना, एका प्रवाशाने चालत्या लोकल ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना पाहिले ट्रेन आणि प्लॅटफॉर्म मध्ये घसरून पडताना दिसला. त्यांनी तात्काळ धाव घेत प्रवाशाला खेचून त्याचा जीव वाचवला. त्यांच्या धाडसी प्रयत्नाने एखाद्याचा जीव वाचवण्यास मदत झाली.

विजय महादेव परब, फिटर (सी अन्ड डब्लू ), दादर, मुंबई विभाग
18 जानेवारी 2024 रोजी ड्युटीवर असताना पीट लाइन 11021 डीएनच्या एअर ब्रेकची तपासणी करताना, 3 वातानुकूलित डब्बे क्रमांक सीआर-141453 च्या बाजूच्या वेअरवर एक तडा गेलेला दिसला. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कळवले आणि तातडीने योग्य ती पावले उचलण्यात आली. त्यांच्या सूक्ष्म निरीक्षण कौशल्याने संभाव्य दुर्घटना टाळण्यास मदत झाली.

भुसावळ विभाग

जितेंद्र कुमार, ट्रॅक मेंटेनर, चांदूर बाजार, भुसावळ विभाग
3 जानेवारी 2024 रोजी मध्यरात्री 00.07 वाजता ड्युटीवर असताना त्यांना मालगाडीच्या 17 व्या वॅगनमध्ये गरम धूर दिसला. त्यांनी तात्काळ चांदूर बाजार स्थानकाला गाडी थांबवल्याची माहिती दिली व समस्या दूर झाली. कर्तव्याप्रती त्याच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली.

सुनील शांताराम, ट्रॅक मेंटेनर, वाघोडा, भुसावळ विभाग
24 जानेवारी 2024 रोजी गस्तीवर असताना, किमी 484/9-7 येथे रेल्वेला तडा गेला. त्यांनी तातडीने ट्रॅकचे संरक्षण करून सर्व संबंधितांना माहिती दिली. त्यांची तत्परता आणि निर्णय घेण्याच्या कौशल्यामुळे दुर्घटना टाळण्यास मदत झाली.

आनंद पटले, स्थानक उपव्यवस्थापक, शेगाव, भुसावळ विभाग
2 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 10.45 वाजता पासिंग मालगाडीसोबत सिग्नल्सची देवाणघेवाण करताना कर्तव्यावर असताना, 16 व्या वॅगनमध्ये आगीच्या ज्वाळा दिसल्या. त्यांनी लगेच रेड सिग्नल दिला. ट्रेन थांबवण्यात आली आणि लोको पायलट आणि ट्रेन मॅनेजरच्या मदतीने तपासणी केली असता वॅगनच्या एक्सल बॉक्सला आग लागल्याचे आढळले. अग्निशमन यंत्राच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. त्यांची सतर्कता आणि उत्कट निरीक्षण कौशल्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यास मदत झाली.

नागपूर विभाग

रुद्र खांडेकर, सहाय्यक लोको पायलट, नागपूर विभाग
28 डिसेंबर 2023 रोजी कर्तव्यावर असताना, रात्री 11.00 वाजता पदभार स्वीकारल्यानंतर, इंजिनच्या तपासणीदरम्यान, ट्रॅक्शन लिंक-1 वर तडा दिसला. त्यांनी तातडीने ड्युटीवर असलेल्या लोको पायलटला माहिती दिली. आमला येथे लोको बिघाड म्हणून चिन्हांकित केले गेले. त्यांचे बारकाईने निरीक्षण आणि तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

देवेंद्र बोरबन, सहाय्यक लोको पायलट, आमला, नागपूर विभाग
इटारसी यार्ड येथे 3 जानेवारी 2024 रोजी कर्तव्यावर असताना पहाटे 3.40 वाजता पदभार स्वीकारल्यानंतर, तपासणीदरम्यान नकल पिन तुटलेल्या अवस्थेत असल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने ड्युटीवर असलेल्या लोको पायलटला माहिती दिली. इटारसी यार्डमध्ये लोकोला बिघडलेला म्हणून चिन्हांकित केले. त्यांचे बारकाईने निरीक्षण आणि तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

सागर राजाराम वाघचौडे, पॉइंट्समन, मालखेड, नागपूर विभाग
13 डिसेंबर 2023 रोजी मालखेड स्थानकावर कर्तव्यावर असताना, मालगाडीच्या 19 व्या वॅगनमध्ये एक हॉट एक्सल दिसला. त्याने लगेच रेड सिग्नल दिला, ट्रेन टिमटाला पर्यंत सावधगिरीने चालवली गेली जिथे हॉट एक्सल कोच वेगळा करण्यात आला होता. त्यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

सोलापूर विभाग

विनायक महादेव घोडके, ट्रेन व्यवस्थापक, सोलापूर, सोलापूर विभाग
12 जानेवारी 2024 रोजी डाउन मालगाडी मध्ये, शाहबाद स्टेशनवर ड्युटीवर असताना, त्यांच्या लक्षात आले की अप मालगाडीच्या एका वॅगनचे अडॅप्टर कमीत कमी 35 ते 40 अंश, वाकलेल्या स्थितीत होते जे धोकादायक ठरू शकते. त्यांनी ताबडतोब सर्व संबंधितांना माहिती दिली, तो डब्बा वेगळा करण्यात आला आणि त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य गंभीर अपघात टळला.

धीरेंद्र कुमार, सहाय्यक लोको पायलट, दौंड, सोलापूर विभाग
21 जानेवारी 2024 रोजी कर्तव्यावर असताना, लोको क्रमांक 23553 च्या अंडर गियरच्या तपासणीदरम्यान पदभार स्वीकारल्यानंतर, ट्रॅक्शन मोटार क्रमांक 4 च्या होरिझोंटल नोझ पिन गहाळ असल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ ड्युटीवर असलेल्या लोको पायलटला माहिती देऊन आवश्यक ती कारवाई करण्यात आली. त्यांचे बारकाईने निरीक्षण आणि तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

पुणे विभाग

पवन कुमार, तंत्रज्ञ (सी अँड डब्लू), मिरज, पुणे विभाग
15 जानेवारी 2024 रोजी मिरज यार्ड येथे मालगाडीची तपासणी करताना, ब्रेक व्हॅनच्या मध्यवर्ती पिव्होटचा वरचा भाग तुटलेला असल्याचे लक्षात आले. वॅगन तातडीने नीट नसल्याचे चिन्हांकित करण्यात आले आणि त्यामुळे त्याच्या सतर्कतेमुळे संभाव्य दुर्घटना ( Central Railway) टळली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.