Talegaon Dabhade : भारतीय संस्कृतीत नर्मदा नदीचे महत्त्व अनन्यसाधारण – प्रवचनकार कक्षा पाटील

एमपीसी न्यूज – भारतीय संस्कृतीत नर्मदा नदीचे महत्त्व अनन्यसाधारण ( Talegaon Dabhade) आहे. नर्मदा नदी ही भारतातील सर्वात प्राचीन नद्यांपैकी एक प्राचीन नदी आहे. त्यामुळेच तिच्या परिक्रमेने पुण्य आपल्या पदरी पडते, असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रवचनकार कक्षा पाटील यांनी केले.

तळेगावातील प्रसिद्ध लेखक, गडकिल्ले अभ्यासक, म.सा.प. मावळ शाखेचे कार्याध्यक्ष ओंकार वर्तले यांच्या ‘उत्तर वाहिनी नर्मदा नदी व दत्तस्थाने’ या नाविन्य प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
ज्येष्ठ नागरिक संघ, परिक्रमा पूर्ण केलेले परिक्रमावासी यांच्या साक्षीने मोठ्या दिमाखात या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सद्गुरु टूर्स संचालक   विलास कुलकर्णी, म. सा. प. मावळ शाखेचे अध्यक्ष श्रीकृष्ण पुरंदरे , बांधकाम व्यावसायिक  संग्राम जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
 पाटील यांनी यावेळी उपस्थितांना नर्मदा नदीचे धार्मिक महत्त्व समजावून सांगितले. तसेच या नदीच्या परिक्रमे विषयी सखोल माहिती दिली.
ओंकार वर्तले यांनी आपल्या मनोगतात, भटकंती करताना नर्मदा नदीचे आकर्षण वाटले. त्यातूनच हे उत्तर वाहिनी नर्मदा नदीचे पुस्तक आकारास आले असे सांगितले. तसेच सध्याच्या नद्या मानवाने अत्यंत घाणेरड्या केल्या आहेत, त्यामुळे नद्या स्वच्छ ठेवणे ही सुद्धा आपली एक सामाजिक जबाबदारी आहे असे मत व्यक्त केले.
श्रीकृष्ण पुरंदरे यांनी प्रास्ताविकामध्ये हे पुस्तक परिक्रमा करणाऱ्या भक्तांना मार्गदर्शक ठरेल अशी आशा व्यक्त केली. यावेळी विलास कुलकर्णी व जगताप यांचीही मनोगते झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर देशमुख यांनी केले. आभार डॉ. माधुरी वर्तले ( Talegaon Dabhade) यांनी मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.