PCMC : पाणीपुरवठा योग्य दाबाने करा; जनसंवाद सभेत मागणी

एमपीसी न्यूज – पाणीपुरवठा योग्य दाबाने करावा, रस्त्यांवरील खड्डे (PCMC)बुजविण्याचे काम वेगाने करावे. पदपथांवर उभारण्यात आलेले अतिक्रमण काढावेत अशा मागण्या नागरिकांनी जनसंवाद सभेत केल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या (PCMC)आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार सर्व क्षेत्रिय कार्यालयांत करण्यात येते. सभेचे अध्यक्ष तथा मुख्य समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या महापालिका क्षेत्रीय कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांना महापालिकेच्या अनुषंगाने असलेली कामे, अडचणी, तक्रारी, सूचना या सर्व बाबींची नोंद घेऊन संबधितांना या बाबतीत कार्यवाही करण्याच्या सूचना महापालिकेकडून दिल्या गेल्या आहेत.

Pune :मध्यमवर्गाने आपल्या कार्यक्षेत्रात राहून वंचितांसाठी कार्य करावे -डॉ. कुलकर्णी

महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयांमध्ये आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी सहभाग घेऊन एकूण 57 तक्रारवजा सूचना मांडल्या. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अनुक्रमे 10, 6, 5, 7, 3, 2, 15 आणि 9 तक्रारी वजा सूचना मांडल्या.

अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, मुख्य अभियंता श्रीकांत सवणे, सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, सह शहर अभियंता मनोज सेठीया, संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, उप आयुक्त अजय चारठाणकर यांनी भूषवले. तसेच यावेळी क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, अण्णा बोदडे, डॉ. अंकुश जाधव, राजेश आगळे, सिताराम बहुरे, अजिंक्य येळे, उमेश ढाकणे उपस्थित होते.

आज झालेल्या जनसंवाद सभेत पाणीपुरवठा योग्य दाबाने करावा, रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम वेगाने करावे. पदपथांवर उभारण्यात आलेले अतिक्रमण काढावेत, रस्त्यांची साफसफाई तसेच रस्त्याच्या पातळीपासून खोल गेलेले चेंबर व फुटलेल्या मलवाहिन्या लवकर दुरुस्त कराव्यात, रस्त्याच्या कडेला पदपथांवर अनधिकृत फळविक्रेते, हातगाड्या तसेच उभारण्यात आलेले अतिक्रमण काढावेत, त्याठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचनांचा प्रामुख्याने समावेश होता.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.