Kamshet : वडिवळे पूल पाण्याखाली; आठ गावांचा संपर्क तुटला

एमपीसी न्यूज – मागील चार दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत आहे. तसेच नदीला जोडणाऱ्या ओढ्या-नाल्यांना पुराचे रूप आले आहे. मावळ तालुक्यातील वडिवळे गावाच्या हद्दीत असलेला पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे आसपासच्या सुमारे आठ गावांचा मुख्य बाजारपेठेशी संपर्क तुटला आहे. 

खांडशी, नेसावे, वळख, सांगिसे, बुधवडी, वेल्हवळी, उंबरवाडी, वडिवळे या गावांसाठी मुख्य बाजारपेठ कामशेत आहे. गावातील दूध व्यावसायिक, कामगार मोठ्या संख्येने कामशेतला जातात. मात्र मागील चार दिवसांपासून आलेल्या मुसळधार पावसामुळे वडिवळे पुल पाण्याखाली गेला आहे. हा पूल वरील आठ गावांना कामशेतशी जोडतो. परंतु पूल पाण्याखाली गेल्याने या आठ गावांचा जनसंपर्क तुटला आहे. 

दूध व्यावसायिक व कामगारांचे यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे कामशेतमधील दूध ग्राहकांची देखील गैरसोय झाली आहे. गावातील भाजीपाला बाजारात आला नसल्याने बाजार शेतकऱ्यांशिवाय ओस पडला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.