Wakad : देहूरोड कात्रज बाह्यवळण मार्गावर खासगी बस पुलाच्या कठड्याला धडकून उलटली; 8 ते 10 जण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – वाकड येथे देहूरोड कात्रज बाह्यवळण मार्गावर एका खासगी बसचा उलटून अपघात झाला. या अपघातात 8 ते 10 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.  

मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली ते कोल्हापूर (MH 09 CV 3697) ही खासगी बस वाकड येथून देहूरोड कात्रज बाह्यवळण मार्गावरून जात असताना मुळा नदीवरील वाकड पुलाच्या कठड्याला धडकल्याने उलटली. सुदैवाने ही बस नदीत पडली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, बस उलटल्याने बसमधील 8 ते 10 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.