Kamshet : कामशेत खिंडीत स्कॉर्पिओ उलटली

एमपीसी न्यूज – जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कामशेत खिंडीत स्कॉर्पिओ कार उलटली. हा अपघात आज (सोमवारी) सकाळी दहाच्या सुमारास झाला. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही.

पुण्याहून लोणावळ्याच्या दिशेने जात असताना कामशेत खिंडीत स्कॉर्पिओ (के ए 05 / ए जी 8732) आली असता रस्त्यावर सांडलेले ऑइल आणि त्यावर पडलेल्या पावसामुळे कार घसरली. अचानक कार घसरल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार उलटली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अपघातानंतर घटनेची माहिती महामार्ग पोलिसांना मिळताच महामार्ग पोलिसांनी तात्काळ कार रस्त्याच्या बाजूला केली. सकाळच्या सुमारास अपघात झाल्याने याचा वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.