Pimpri : शहर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरु; शहराध्यक्षांपाठोपाठ आता सर्व पदाधिका-यांचे सामूहिक राजीनामे

प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्याकडे पाठविले राजीनामे 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराकडे पक्षश्रेष्ठी दुर्लक्ष करत असल्याचे सांगत शहराध्यक्ष सचिन साठे यांनी रविवारी (दि.8) पक्ष निरीक्षक मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केला होता. दुस-या दिवशी लगेच सर्व पदाधिका-यांनी सामूहिक राजीनामे देऊन साठे यांना पाठिंबा दर्शविला आहे. अशोक चव्हाण यांच्याकडे राजीनामे सादर केले आहेत. यामुळे शहर काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

यामध्ये महिला प्रदेश काँग्रेसच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, सेवादलाचे अध्यक्ष संग्राम तावडे, प्रदेश एस.सी विभागाचे उपाध्यक्ष गौतम आरगडे, महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे लक्ष्मण रूपनर, मावळ लोकसभा मतदार संघाचे युवक अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, एनएसयूचे प्रदेश उपाध्यक्ष उमेश कंधारे, अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, ओबीसी विभागाचे किशोर कळसरकर, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णू नेवाळे, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब साळुंके, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष परशुराम गुंजाळ, प्रदेश अल्पसंख्याक विभाग उपाध्यक्ष राजेंद्रसिंग वालिया, प्रदेश महिला काँग्रेस सचिव बिंदू तिवारी, एनएसयूआयचे अध्यक्ष विशाल कसबे, मयुर जैस्वाल, सज्जी वर्की या पदाधिका-यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे राजीनामे पाठविले आहेत. यामुळे शहर काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

शहराध्यक्ष सचिन साठे यांनी पक्षाच्या व्यासपीठावर शहरातील कार्यकर्त्यांची व्यथा मांडली. त्या भूमिकेशी आम्ही सर्व सहमत आहोत. त्यामुळे आमच्यावर असलेल्या जबादारीतून मुक्त करुन आमचा राजीनामा स्वीकारण्यात यावा, अशी विनंती त्यांनी केली. तसेच पक्षाच्या विश्वासाबद्दल ऋण व्यक्त करत पुढील काळात पक्षाचे कार्यकर्ते म्हणून सक्रिय राहू, असे म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.