Pimpri : रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनतर्फे वारक-यांना कापडी पिशवी आणि टोप्यांचे वाटप

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन यांच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील गाडगेबाबा स्वच्छता दिंडीतील सहभागी वारक-यांना 500 कापडी पिशवी आणि टोप्यांचे वाटप करण्यात आले.

आळंदीतील, धर्मशाळेत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनचे अध्यक्ष सदाशिव काळे, सचिव महादेव शेंडकर, प्रकल्प अधिकारी संतोष भालेकर, माजी अध्यक्ष अनिल शर्मा, पंकज अभंग, सुवर्णा काळे, अनिता शर्मा आदी उपस्थित होते.

रोटरीचे अध्यक्ष सदाशिव काळे म्हणाले, "संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात दरवर्षी गाडगेबाबा स्वच्छता दिंडी सहभागी होते. या दिंडीतील वारकरी पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी आदल्या दिवशी पोहोचतात. मुक्काम स्थळाची सर्व स्वच्छता करतात. हा उपक्रम गेल्या अनेकवर्षांपासून सुरु आहे. पर्यावरणाची आणि नागरिकांच्या आरोग्याची हानी टाळण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्या, ग्लास, कप, प्लेट्स, बाटल्या इत्यादींच्या उत्पादनांवर तसेच वापरावर पूर्णपणे बंदी आणून, महाराष्ट्र प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यांची कडक अंमलबजावणी सुरु आहे"

वारक-यांनीही प्लास्टिकचा वापर टाळावा. यासाठी रोटरी क्लबच्या वतीने 500 कापडी पिशव्यांचे आणि टोप्यांचे वाटप करण्यात आले आहे, असेही काळे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.