Pune : संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनतर्फे वारक-यांना अन्नदान

एमपीसी न्यूज – संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनतर्फे आळंदीहुन तसेच देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या वारक-यांना अन्नदान करण्यात आले.

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी मार्गावर संत निरंकारी मिशनतर्फे विश्रांतवाडी चौक येथे पाणी, अल्पोपाहार देण्यात आला. तसेच संत निरंकारी मिशनच्या आध्यात्मिक पुस्तकांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला पुणे प्रदेश प्रमुख ताराचंद करमचंदानी उपस्थित होते. मुलूक राय यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गावर देखील खडकीमध्ये पाणी वाटप करण्यात आले. या ठिकाणी मेजर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला धानोरी तसेच खडकी येथील सेवादल,संत निरंकारी चेरिटेबल फाऊंडेशनचे स्वयंसेवक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.