Pimple Nilakh : तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज – लग्नाचा तगादा लावल्याने 21 वर्षीय तरुणीने आत्महत्या ( Pimple Nilakh) केली आहे. ही घटना 5 नोव्हेंबर रोजी पिंपळे निलख येथे घडली आहे.

याप्रकरणी ऋषभ उर्फ पिन्या अविनाश कांबळे (रा. औंध) याच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात मयत मुलीच्या बहिणीने फिर्याद दिली आहे.

Pimpri : जल दिवाळी उपक्रमाअंतर्गत जलशुध्दीकरण केंद्राची दिली जातेय माहिती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व मयत मुलीचे प्रेमसंबंध होते. मात्र 1 वर्षापासून ते एकमेकांशी बोलत नव्हते. यावेळी आरोपीने मयत मुलीला सतत फोन लावून, पाठलाग करून लग्नाचा तगादा लावला.

यासाठी तो तिला जबरदस्ती करत होता व धमकी देत होता. त्याच्या या छळाला कंटाळून पीडितेने आत्महत्या केली. यावरून आरोपीवर सांगवी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत ( Pimple Nilakh) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.