Pimple Saudagar News: सेईको काई कराटे संस्थेच्या खेळाडूंचा गौरव

एमपीसी न्यूज – सेईको काई कराटे इंटरनॅशनल इंडिया या संस्थेचा 14 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. यानिमित्त 2018-19 या वर्षातील जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळवलेल्या खेळाडूंचा विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

पिंपळे सौदागर येथे झालेल्या कार्यक्रमाला माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक निलेश बनसोडे, पुणे जिल्हा कराटे संघटनेचे अध्यक्ष शिहान सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश गायकवाड, राज गायकवाड, सेईको काई कराटेचे पुणे समन्वयक सेन्साई परेश रडे, संतोष मसकर उपस्थित होते.

2018-19 या वर्षातील जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळवलेल्या खेळाडूंचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. गेल्या 14 वर्षामध्ये संस्थेने जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवले आहेत. 4 वर्षापुढील सर्व विद्यार्थ्यांना येथे प्रशिक्षण दिले जाते. या संस्थेमार्फत महिलांसाठी मोफत स्वसंरक्षण शिबिर आयोजित केले जाते.

सेन्साई चंदनशिवे, बुद्धभुषण गायकवाड, प्रिजा नायर, जुही खंडागळे, परमेश्वर गायकवाड, सिमरन पुणेकर , अश्विन चौहान, हेमंत डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व खेळाडू सराव करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.