Pimpri :- ‘नृत्यभारती ‘ कार्यक्रम संपन्न

भारतीय विद्या भवन व इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन

एमपीसी न्यूज:- भारतीय विद्याभवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार (Pimpri) कार्यक्रमांतर्गत ‘नृत्यभारती ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
काल (15 एप्रिल )  सायंकाळी साडे पाच वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम झाला. शास्त्रीय नृत्य सादरीकरणाचा हा कार्यक्रम भारती विद्यापीठाच्या स्कुल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् तर्फे प्रस्तुत करण्यात आला.वैशाली टांक(भरतनाट्यम),मौशुमी जाजू(कथक),आभा औटी(कथक),सुकन्या कुलकर्णी,स्पृहा कुलकर्णी(भरतनाट्यम) यांनी बहारदार सादरीकरणे केली.

वैशाली टांकच्या शिव स्तुती, गीत गोपालमधील पद, ‘ सुजन कसा मन चोरी ‘ हे नाटयगीत , तराणा अशा सादरीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला. मौशुमी यांनी शिव ध्रुपद , चौताल आणि ठुमरीने मने जिंकली. तर आभा औटी यांच्या गणेश स्तुती, ध्रुत झप ताल, ठुमरी लाही उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. सुकन्या आणि स्पृहा यांच्या तिल्लानालाही प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद मिळाला.
भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले. भारती विद्यापीठ स्कुल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् चे संचालक डॉ. शारंगधर साठे, ज्येष्ठ नृत्य गुरू सुचेता भिडे -चापेकर, मनिषा साठे, स्वाती दैठणकर हे मान्यवर आदी उपस्थित होते. लीना केतकर यांनी सूत्रसंचालन केले.हा कार्यक्रम विनामूल्य होता. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा 160 वा कार्यक्रम होता. भारती विद्यापीठ स्कुल ऑफ परफॉर्मिंग आर्टच्या सहकार्याने दर दोन महिन्यांनी अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.