Pimpri: कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी कनिष्ठ अभियंत्याची वेतनवाढ रोखली


एमपीसी न्यूज – रस्त्याचे काम एकाच ठेकेदाराला दिल्यामुळे पालिकेचे तब्बल एक कोटी 32 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा ठपका ठेवत कनिष्ठ अभियंत्याची आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी वेतनवाढ रोखली आहे. तसेच वासयीएम रुग्णालयात वारंवार अनुउपस्थित राहिल्याने वैद्यकीय अधिका-याची खातेनिहाय चौकशी सुरु करण्यात आली आहे.

राजेंद्र वसंतराव राणे असे वेतन वाढ रोखलेल्या कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ब’ क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीतील हॉटेल सुरुची ते चापेकर चौक या रस्त्याच्या कामाचे तीन टप्पे करुन, ते काम एकाच ठेकेदाराला दिले. रस्त्याचे काम एकाच ठेकेदाराला दिल्याने निकृष्ठ झाले. कामामध्ये त्रुटी राहिल्याने कामाचा अपेक्षित दर्जा राखला गेला नाही. त्यामुळे चार ते पाच महिन्यातच रस्ता खराब झाला. तसेच पालिकेचे एक कोटी 32 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

या कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत कनिष्ठ अभियंता राणे यांची एक वेतनवाढ रोखण्यात आली आहे. तसेच यापुढे त्यांनी कोणत्याही स्वरुपाच्या कार्यालयीन कामकाजामध्ये गैरवर्तन केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर जबर शास्तीची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच याची राणे यांच्या सेवा पुस्तकात नोंद करण्यात येणार आहे.

पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएमएच्) रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात वांरवार अनुउपस्थित राहिल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. विनायक पाटील यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.