Pimpri : व्हायब्रण्ट एच आरच्या साहसी गिर्यारोहकांकडून कळसुबाई शिखर सर

एमपीसी न्यूज – व्हायब्रण्ट एच आर ही मानवी संसाधन विभागाच्या साहसी गिर्यारोहकांनी महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेले कळसुबाई शिखर नुकतेच सर केले.

ही मोहिम 9 डिसेंबरला सकाळी पहाटे साडे चारवाजता सुरु करण्यात आली. तीन तासाच्या खडतर ट्रेकिंग करून या टीमने 5400 फुटाचे कळसुबाई शिखर सर केले. हे करत असताना घोंगावणारा थंड वारा, निसरडा रस्ता, दमछाक करायला लावणारे चढउतार, खोल दरी आणि सर्वात महत्वाचे अवघड व डोळे फिरवणारे लोखंडी जिने अशा अनेक अडचणींवर मात करीत या टीमने महाराष्ट्राचे सर्वात उंच शिखर सर केले. कळसुबाई देवीचे दर्शन घेतले.

मात्र या ठिकाणी पडलेला प्लॅस्टिकच्या कचऱ्याने या गिर्यारोहकांना खूप वाईट वाटले. लवकरच या टीमच्या वतीने कळसुबाई शिखर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी कळसुबाई स्वछता व जागृती अभियान राबवण्यात येणार आहे अशी माहिती सुधीर पाटील यांनी दिली. त्याच प्रमाणे येत्या 23 व 24 डिसेंबर रोजी सालाबाद प्रमाणे रायगड स्वछता अभियान राबवण्यात येईल अशी माहिती दिली. ही मोहीम सुधीर पाटील आणि शंकर साळुंखे यांचे मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. या मोहिमेत सुधीर पाटील, मिलिंद पोरे, शीतल साळुंके, अनिल उबाळे, संतोष पवार, रोहिणी शेडगे आणि शंकर साळुंखे यांचा समावेश होता. ही मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अनिल उबाळे, शीतल साळुंके यांनी मोलाचे सहकार्य केले.

व्हायब्रण्ट एच आर ही मानवी संसाधन विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱयांची संघटना असून ती आपल्या सभासदांसाठी नेहमीच आगळे वेगळे व साहसी उपक्रम राबवत असते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.